Maharashtra Crime News | काय सांगता! पोलिसांनीच मांडला पोलीस अधीक्षक कार्यालयात जुगाराचा डाव, थेट अधीक्षकांनीच धाड टाकून पकडलं अन् गुन्हाही नोंदवला

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | जुगार अड्ड्यांवर (Gambling Den) छापा मारुन पोलिसांकडून कारवाई केली जाते हे सर्वांना माहिती आहे. परंतु परभणीत उलट झाले आहे. पोलीस अधीक्षकांनीच पोलिसांच्या (Parbhani Police) जुगारावर छापा मारुन सात जणांना पकडलं. पोलीस अधीक्षक कार्यालयातील (SP Office Parbhani) आरसीपीच्या गेस्ट रुममध्ये हे सात पोलीस जुगार खेळत होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी थेट आरसीपीच्या रुमवर जाऊन जुगार खेळणाऱ्या पोलिसांना रंगेहाथ पकडले. एवढेच नाहि तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे परभणी पोलीस दलात (Parbhani Police Force) खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime News)

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय (Parbhani Superintendent of Police Office) परिसरात आरसीपी रुम आहे. या रेस्ट रुममध्ये काही पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर रागसुधा (SP R Ragasudha) यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी थेट या रूमवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी सात पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्यांच्याकडून 5 हजार रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या सात जणांमध्ये पाच पोलीस अधीक्षक कार्यालयातील, एक महामार्ग पोलीस (Highway Police) आणि एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (Anti-Corruption Department) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सात जणांवर मोंढा पोलीस ठाण्यात (Mondha Police Station) आयपीसी 12अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.

अधीक्षक कार्यालयात डाव मांडला

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. अनेक महत्त्वाच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी याठिकाणाहून आदेश दिले जातात. विशेष म्हणजे परभणी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख देखील याच कार्य़ालयात बसता. मात्र, याच कार्यालयात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगाराचा डाव मांडला होता.

पोलीस दलात प्रचंड खळबळ

पोलीस अधीक्षक कार्य़ालयातच पोलिसांनी जुगाराचा डाव मांडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी जुगारी पोलिसांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परभणी पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस कारवाई करायचे, मात्र, या प्रकरणात थेट पोलिसांवरच कारवाई करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या घटनेची पोलीस दलात दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती. (Maharashtra Crime News)

अधीक्षकांना पाहून धाबे दणाणले

आरसीपी पथकाला थांबण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील एक खोली देण्यात आली आहे.
मात्र, यातील काही पोलीस कर्मचारी इतर पथकाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन याच खोलीत पैशांवर जुगार खेळत होते.
याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी याठिकाणी छापा टाकला. स्वत: पोलीस अधीक्षक खोलीत आल्याचे पाहून
जुगारी पोलिसांना धक्का बसला. त्यांना नेमकं काय करावं आणि काय बोलावं हेच सुचत नव्हतं.
मात्र, पोलीस अधीक्षकांनी जुगारी पोलिसांना चांगलेच सुनावलं आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On BJP Modi Govt | सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारवर घणाघात; देशावरील कर्ज दुप्पट केलं…सरकारने माफी मागावी