महाराष्ट्रात सुरु झालीये अनोखी बँक; कर्जावर बकरी घेऊन जा अन् नंतर चार शेळ्या द्या, जाणून घ्या

मुंबई : बँक म्हटलं की तुम्हाला पैशांच्या व्यवहाराशी संबंधित चित्र समोर येते. सर्वसामान्य लोक बचत करून जमा झालेली रक्कम बँकेत जमा करतात आणि गरज पडल्यास हीच रक्कम पुन्हा काढतात. पण महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात नवी ‘बँकिंग सिस्टिम’ सुरु केली जात आहे.

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ सुरु करण्यात आली आहे. नाव ऐकूनच बकऱ्यांशी संबंधित ही काहीतरी योजना असेल असे वाटत असेल ना. मग त्याचं उत्तर होय आहे. 52 वर्षीय नरेश देशमुख यांनी ही अनोखी गोट बँक सुरु केली आहे. अकोल्यातील सांघवी मोहाली गावात ही बँक सुरु आहे.

मजूरांकडून मिळाली प्रेरणा

नरेश देशमुख यांनी याबाबत सांगितले, की बकऱ्यांच्या संबंधित बँक स्थापन करण्याची प्रेरणा मेहनती मजूरांच्या कुटुंबाकडून मिळाली. हे सगळे मजूरकाम करण्याबरोबरच शेळी पालन करतात. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत होते.

एका बकरीच्या बदल्यात 4 पिल्ले

या गोट बँकेकडून प्रत्येक महिलेकडून 1200 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक गरोदर शेळी दिली जाते. पण शेळी घेताना करारही करण्यात येतो. त्यानुसार 40 महिन्यात बकरीच्या बदल्यात 4 शेळ्यांची पिल्ले बँकेला द्यावी लागताच.

कोट्यवधींची कमाई

बकरी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून नरेश देशमुख यांना आता मोठा फायदा झाला आहे. त्यांनी कोट्यवधींची कमाई केली.