Maharashtra Govt Employees News | नोकरशहांवर सरकार मेहरबान, कारसाठी आता मिळणार १५ लाख रुपये; GR निघाला

मुंबई : Maharashtra Govt Employees News | सरकारी राजपत्रित अधिकाऱ्यांना कार घेण्यासाठी मिळणाऱ्या अ‍ॅडव्हान्समध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ही रक्कम १५ लाख केली आहे. आता नवीन निर्णयानुसार नवीन गाडीच्या खरेदीसाठी १५ लाख, तर जुन्या गाडीसाठी ७.५० लाख अ‍ॅडव्हान्स (Advance) दिला जाईल. या निर्णयामुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. (Maharashtra Govt Employees News)

शासकीय अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठी अ‍ॅडव्हान्स मर्यादा संबंधीचा हा निर्णय १७ ऑक्टोबरला राज्य शासनाने (State Government) घेतला आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ पासून सुधारित केली आहे. या सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतनावर आधारित मोटार कार खरेदीसाठी अग्रीम मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची कार खरेदीसाठी संबंधित अधिकाऱ्यास उर्वरित रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागणार आहे.

कार खरेदीसाठी कर्जाच्या रकमेवर सरळ १० टक्के व्याजाची आकारणी केली जाते. त्यामुळे इतर कर्जापेक्षा हे सोयीचे ठरते. कारच्या अग्रीमच्या वसुलीसाठी वाहनाचा लिलाव करावा लागल्यास येणाऱ्या रकमेपेक्षा शिल्लक वसुलीपात्र रक्कम दंडनीय व्याजासह संबंधित अधिकाऱ्याच्या सेवा उत्पादन, रजेचे रोखीकरण, आदी रकमांमधून वसूल केले जाईल. (Maharashtra Govt Employees News)

या निर्णयामुळे अधिकारी वर्गाची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. कागदपत्रातही फारशी क्लिष्टता नाही.
याचा फायदा अधिकारी वर्गाला होणार आहे. मात्र, याची अंमलबजाणी कधीपासून होणार याबाबत स्पष्टता नाही

वाहनासाठी घेतलेल्या १५ लाखांच्या अ‍ॅडव्हान्सची परतफेड १२ वर्षांत करायची आहे. हप्ते फेडल्यावरच गाडी नावावर होईल.
तर जुन्या गाडीसाठी हा कालावधी सहा वर्षांचा आहे. तोपर्यंत ही गाडी सरकार लेखी गहाण राहील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On BJP Modi Govt | सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारवर घणाघात; देशावरील कर्ज दुप्पट केलं…सरकारने माफी मागावी