Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही – मंत्री उदय सामंत

मुंबई : Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईत सुमारे नऊ ठिकाणी कबुतरखाने (Pigeon Houses In Mumbai) असून कोणत्याही कबुतरखान्याला हेरिटेज (वारसा) दर्जा (Heritage Status) प्राप्त नाही अथवा असा दर्जा देता येणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) स्पष्ट केले.

सदस्या उमा गिरीष खापरे (MLC Uma Girish Khapre) यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) म्हणाले की, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), जी.पी.ओ. (GPO Mumbai), एन.एस.रोड पेट्रोल पंप (NS Road Petrol Pump, Mumbai), ऑगस्ट क्रांती मैदान (August Kranti Maidan), गिरगांव चौपाटी (Girgaon Chaupati), नवजीवन सोसायटी, मलबार हिल (Malabar Hill), एम.एस. अली रोड जंक्शन (Ms Ali Road Mumbai) व दादर (Dadar Mumbai) या प्रमुख ठिकाणी कबुतरखाने (Pigeons) असून येथे बऱ्याच वर्षापासून कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) के.ई.एम. रुग्णालयातील (KEM Hospital Mumbai) श्वसनविकार चिकित्सा व पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा व पर यामध्ये फंगल स्पोर्स (Fungal spores) आढळून आली होती.

यामुळे माणसांना एक्सट्रेंसिक ॲलर्जिक ॲलव्होलिटीस (Extrinsic Allergic Alveolitis) हा आजार होऊ शकतो.
या आजाराची खोकला, दमा, ऑक्सिजनची पातळी कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य उपविधी, २००६ नुसार, अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राण्यांना
खायला घातल्यास, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणे या कलमांतर्गत प्रति घटना ५०० रूपये इतका दंड
आकारला जातो. मागील तीन महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला घालून उपद्रव माजविल्याबाबत
१०,००० रूपये इतका दंड महानगरपालिकेमार्फत वसूल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी सहभाग घेतला.

Web Title :- Maharashtra Industries Minister Uday Samant | Pigeon houses in Mumbai do not have heritage status – Maharashtra Industries Minister Uday Samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार