NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) शरद पवार यांच्या वेगवेगळ्या पक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आहेत. परंतु शरद पवारांच्या (NCP Chief Sharad Pawar) राजकीय अनुभवाविषयी सर्वच पक्षांमध्ये एकमत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेची मोठी चर्चा राजकीय वर्तुळासह जनतेमध्ये असते. तसेच त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. सध्या सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शरद पवारांचा शेअर केलेल्या फोटोची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या वडिलांबद्दल अनेकवेळा आपल्या भावना व्यक्त करत असतात. त्या सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार
(Pratibha Pawar) यांच्या सोबत बसलेला फोटो शेअर केला आहे.
ब्लॅक अँड व्हाईट फोटो किमान 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या फोटोसह सुप्रिया सुळेंनी ‘नॉस्टॅलजिया’ अशी एका शब्दांची पोस्ट केली आहे.
या फोटोमध्ये शरद पवार फ्रेंच कट दाढीत (French Cut Beard) असल्याचे दिसत आहे.
तरुण पणातील शरद पवारांना पाहिलेले फारच थोडे कार्यकर्ते असतील.
अनेकांनी शरद पवारांना सध्याच्या लुकमध्येच पाहिले आहे.
त्यामुळे काळीभोर फ्रेंच कट दाढी राखलेल्या शरद पवारांचा हा दुर्मिळ फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | NCP MP supriya sule instagram shared sharad pawar french cut look photo with pratibha pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) Budget | पुणे महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटी रुपयांचे; कुठलिही करवाढ नाही, मात्र…

Top Ten MP in India | देशातील टॉप-टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश, सुप्रिया सुळे ‘अव्वल’