Maharashtra Legislative Winter Session | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची (Maharashtra Legislative Winter Session) तारीख निश्चित झाली आहे. याबाबत आज मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत तारीख ठरवण्यात आली. आता ७ डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) सुरू होईल.

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राज्याच्या हिवाळी अधिवेश ७ डिसेंबरपासून सुरुवात होईल. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालेल. तसेच अधिवेशन सुरू असताना १९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. परंतु, त्यानंतर अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल अशी चर्चा होती. तसेच ७ डिसेंबर की ११ डिसेंबर याबाबत संभ्रम होता, तो आज दूर होऊन अखेर तारीख ठरली आहे.

दरम्यान, अधिवेशनाचा (Maharashtra Legislative Winter Session) कालावधी खुपच कमी असल्याने राज्याचे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती.
मात्र सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही. ३ आठवड्याच्या अधिवेशनाची मागणी होती.
मात्र, सरकारने ३ आठवड्याऐवजी २ आठवड्याचे अधिवेशन ठेवले.

मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी नेत्यांनी सुरू केलेला आरक्षण वाद आणि त्यामध्ये कॅबिनेट
मंत्र्याचा असलेला पुढकार, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण (Drug Mafia Lalit Patil Case), कंत्राटी भरती
(Contract Recruitment), राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्द्यांवरून
अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.

मात्र, सत्ताधारी पक्ष हे प्रश्न गांभिर्याने घेऊन त्यावर कामकाज करतील की, सत्ताधारी सुद्धा नेहमीप्रमाणे विरोधकांवर
आरोप करून वेळ मारून नेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने
शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कोंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या गणेश लोंढे व त्याच्या 6 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 91 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Lalit Patil Drugs Case | राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. संजीव ठाकूरला का वाचवत आहेत?, आ. रविंद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन