Maharashtra MLA Disqualification Hearing | ३१ डिसेंबरपर्यंत आमदार आपत्रता निर्णय अशक्य, सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर मुदतवाढ मागणार?

मुंबई : सध्या आमदार अपात्रता प्रकरणी (Maharashtra MLA Disqualification Hearing) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. परंतु, या सुनावणीचा आवाका दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप यामुळे वाढत चालल्याने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत या प्रकरणाचा (Maharashtra MLA Disqualification Hearing) निर्णय घेणे कठीण दिसत आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष कोर्टाकडे मुदतवाढ मागतील, अशी चर्चा सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यातच सुनावणी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे उर्वरित दिवसात आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेणे कठीण असल्याने विधानसभा अध्यक्ष सुप्रिम कोर्टाकडे मुदतवाढ मागू शकतात.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन कालावधीत सुनावणी घेताना नार्वेकर यांची तारेवरची कसरत होणार आहे. यासाठी त्यांना आणि संबंधित आमदारांना ओव्हरटाइम करावा लागेल. विधिमंडळाच्या कामकाजानंतर सायंकाळी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली जाईल, असेही म्हटले जात आहे. (Maharashtra MLA Disqualification Hearing)

सध्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे.
यानंतर सचिव विजय जोशी यांची साक्ष नोंदवली जाईल, असे समजते.
तर डिसेंबर महिन्यापासून शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे.
यामध्ये भरत गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश असू शकतो.

सध्या शिंदे गटाचे वकील उलट साक्ष घेत आहेत. १ ते ११ डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे (Thackeray Group) वकील उलट
साक्ष घेतील. साक्ष संपल्यावर निकाल देण्यास २० ते २५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
वेळ आणि कामकाजाचा आवाका पाहता विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची विनंती करू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर