Maharashtra Monsoon Session | आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली – भरत गोगावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Shinde Group MLA Mahesh Shinde) यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली. महाराष्ट्रात एककीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक मुद्दे महत्त्वाचे असताना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी घटना घडल्याने राज्याची मान शरमेने खाली गेली आहे.

 

हा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी (Mahavikas Aghadi MLA) तुम्हाला धक्काबुक्की केली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर भरत गोगावले रागाने म्हणाले, अरे हट् ! ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया येते हे पहावे लागेल. (Maharashtra Monsoon Session)

भरत गोगावले म्हणाले, महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर रोज आंदोलन (Agitation) केले. आम्ही आज केले.
आम्ही 170 आहोत, ते 99 – 100. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते.
ते आमच्यावर आंदोलन करुन आरोप करत होत. तेव्हा आम्ही बाजुने जात होतो. त्यांना उत्तरही देत नव्हतो.
आज आम्ही पहिले तिथे होतो. त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ.
आम्ही बांगड्या भरल्यात का ? आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं.
त्यांनी आमचा नाद करु नये. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Session | CM eknath shinde camp bharat gogawale slams ncp mla amol mitkari and mahavikas aghadi after vidhan bhavan rada

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा