Maharashtra Police News | 18 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | पुण्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दल (Maharashtra State Reserve Police Force) गट क्र. 1 व 2 तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी (Maharashtra Intelligence Prabodhini) येथे पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Pune CID) वतीने 18 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे (Maharashtra State Police Duty Meet-2023) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांच्या हस्ते मंगळवारी (दि.5) राज्य राखील पोलीस दल गट क्र. 2 च्या परेड मैदानावर करण्यात आले. (Maharashtra Police News)

यावेळी पुणे सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (IPS Prashant Burde) यांनी प्रमुख पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर स्पर्धेत सहभागी 24 संघांनी शिस्तब्ध संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यापूर्वी राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बँडने शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करुन व वाद्य वाजवून प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Maharashtra Police News)

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गेल्यावर्षी 66 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये (66th All India Police Duty Meet) पदक विजेत्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना व उपस्थितांना Technology, Trust Talent या त्रिसुत्रींचा आपल्या अंगी व्यावसायिक कुशलता, वृद्धींगत होण्यासाठी उपयोग करण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धकांना निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याबाबत मार्गदर्शन करुन आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या. 66 व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण पदक (Gold Medal) प्राप्त करणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण गोविंद गवस (PSI Srikrishna Govind Gavas) यांना उद्घाटनाची ज्योत आणण्याचा मान देण्यात आला. त्यांनी स्पर्धकांना शपथ दिली.

या कार्यक्रमाला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र (Special IGP, Kolhapur) सुनिल फुलारी (IPS Sunil Phulari), पुणे गुन्हे अन्वेषण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक (Pune CID Special IGP) डॉ. दिलीप पाटील भुजबळ (IPS Dr. Dilip Patil Bhujbal), विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे (IPS Sanjay Yenpure), एस.आर.पी.एफ पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक (SRPF Pune Special IGP) अशोक मोराळे (IPS Ashok Morale), अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग रंजनकुमार शर्मा

(IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपमहानिरीक्षक नामदेव चव्हाण (IPS Namdev Chavan),
पोलीस उप महानिरीक्षक प्रशासन सारंग आवाड (IPS Sarang Awad), पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
(IPS Pankaj Deshmuk), एस.आर.पी.एफ गट क्र.2 समादेशक नम्रता पाटील (Namrata Patil),
गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पथक पोलीस अधीक्षक दिनेश बारी (SP Dinesh Bari),
गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले (SP Manisha Dubule),
अपर पोलीस अधीक्षक पौर्णिमा तावरे (Add SP Purnima Taware), तसेच
सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी केले. सुत्रसंचलन गुन्हे शाखेच्या
(Pune Crime Branch) पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंधरकर (PSI Supriya Pandharkar),
पोलीस नाईक सचिन देवडे (Sachin Devde) यांनी केले तर आभार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी मानले.

कार्यकर्त्यांना उद्देशून रागामध्ये मनोज जरांदे (Manoj Jarange) म्हणाले की, “सरकारबरोबची चर्चा बंद करायची का?”
त्यांनी आरक्षण दिलं नाही, तरी 50 वेळा सांगितलं घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं.
भानावर या ना आता तरी. ते चर्चेला आले आहेत. आपण चर्चा करू, आपल्याला नाही पटलं तर ते परत जातील.
ठरवू ना काय करायचं. लगेच पाहिजे आरक्षण? मग मी कशाला बसलोय? लगेच पाहिजे म्हणूनच बसलोय ना”
अशा संतापजनक सुरामध्ये त्यांनी आंदोलकांना सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती