Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्तपदी संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांची नियुक्ती करण्यात आली असून झोन ४ च्या उपायुक्तपदी प्रसाद काटकर (Prasad Katkar PMC) यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune PMC News)

संदीप कदम हे महापालिकेच्या आस्थापनेवर १३ वर्षापुर्वी रुजू झाले. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले. यानंतर औंध आणि कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाकडे सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहीले आहे. पदोन्नतीने झोन ४ चे उपायुक्त म्हणून सुमारे तीन वर्षे कामकाज पाहीले आहे. घन कचरा विभागाच्या उपायुक्त आशा राउत या शासनाच्या अधिकारी असून त्यांचा कार्यकाल ८ सप्टेंबरला संपत आहे.

मागील दीड वर्षांपासून त्यांनी घनकचरा विभागाची जबाबदारी पेलत असताना सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, वसुंधरा अभियान तसेच स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत विविध उपक्रम राबविले. विशेष असे की मागील दीड वर्षात कचर्‍याच्या प्रश्‍नावरून शहरात एकही आंदोलन झाले नाही. (Pune PMC News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल

Pune Traffic Updates | डेक्कन व चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

Dr. Vaishali Waghmare Suspended | 17 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी खेडच्या तत्कालीन तहसीलदार
डॉ. वैशाली वाघमारे निलंबित

MLA Ravindra Dhangekar | आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांची जोड स्तुत्य;
आमदार रवींद्र धंगेकर यांचे मत