Maharashtra Police News | धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं स्वत:चं आयुष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | मुंबईच्या वरळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी मुंबई पोलीस दलात (Mumbai Police Force) कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. कॉन्स्टेबलच्या आत्महत्येमागे गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) भांडण हे कारण समोर आले आहे. (Maharashtra Police News)

आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे वय अवघे 27 वर्ष होते. त्याने केवळ आत्महत्या केली नाही तर सुसाईड करण्यापूर्वी गळ्यात फास लटकवलेला फोटो क्लिक करुन तो फोटो त्याच्या गर्लफ्रेंडच्या मित्राला पाठवला. ज्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे त्याचे गर्लफ्रेंडला समजेल. पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या गर्लफ्रेंड यांच्यात काही कारणास्तव भांडण झाले होते. कॉन्स्टेबल इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मुलीसोबत बोलत असल्याचे त्याच्या गर्लफ्रेंडला समजल्याने ती नाराज झाली होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. मयत पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस दलातील शस्त्रागार विभागात कार्य़रत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत कॉन्स्टेबलचे गोरेगाव येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. एप्रिल महिन्यापासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरु होते. मृत कॉन्स्टेबल इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मुलीसोबत बोलायचा ज्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाले. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास वरळी सी-फेस जवळ त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर सहाच्या सुमारास कॉन्स्टेबलने मुलीला दादर स्टेशन येथे सोडले. त्यानंतर साडेसहा वाजता त्याने गर्लफ्रेंडला सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि रात्री दहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. (Maharashtra Police News)

पोलिसांनी याप्रकरणी मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या भावाचा जबाब नोंदवला आहे.
ज्यामध्ये त्याने कोणावरही संशय व्यक्त केला नाही. पोलिसांनी याबाबत एडीआर रिपोर्ट नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह ताब्यात घेतला.
सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त