Maharashtra Political Crisis | शिवसेनेला मोठा धक्का ! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात ?, 25 पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते देखील

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या (Shivsamvad Yatra) माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील (Satara) शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यानंतर आता 25 पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते त्यांच्या मागे जाणार (Maharashtra Political Crisis) असल्याचे सांगितले जाते.

 

शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव (Purushottam Jadhav) यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इतर शिवसैनिकांशी संपर्क करुन त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच खंडाळा तालुक्यातील (Khandala Taluka) 25 पदाधिकारी आणि 100 पेक्षा जास्त शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असून हा साताऱ्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

खंडाळा येथील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी फोन करुन त्यांच्यासोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी तुम्हाला काही कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.
तसेच आता शिवसेनेचा जिल्हाप्रमुखही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा साताऱ्यात सुरु आहे.
साताऱ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटातील नेत्यांच्या बैठका सुरु आहेत.
त्यामुळे नक्की किती कार्यकर्ते शिंदे गटात जाणार हे अद्याप समजू शकले नाही.
परंतु एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या गटाला मिळाले पाहिजे,
यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

 

शिवसेनेला मोठे खिंडार

जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत पुरुषोत्तम जाधव यांचा संपर्क असल्याने त्याचा फायदा उचलत त्यांना जिल्ह्यात फिरवून संपर्कातले पदाधिकारी कसे जाळ्यात येतील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी पडताना पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख आहेत. तरी देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.
जिल्हा शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे.
तसेच संपर्कप्रमुखच संपर्काच्या बाहेर असल्याची अवस्था असल्याची चर्चा आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | big set back for shiv sena chief uddhav thackeray more than 100 shiv sainiks and 25 office bearers join cm eknath shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा