Maharashtra Political News | पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील, शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पूर्ण झाली असून न्यायमूर्तींनी निकाल राखून ठेवला आहे. यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना राजकीय चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोर्टाच्या निर्णयाला घेऊन अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत. राजकीय चर्चांचा उगम मुंबईत होत असला तरी त्याचे पडसाद मात्र संभाजीनगरमध्ये उमटताना दिसत आहेत. सरकार टीकेल की नाही? याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

फक्त आठ दिवसांत सगळं बदलेल

राज्यातील राजकीय सारीपाटाचा खेळ न्यायालयाच्या निर्णयावर (Maharashtra Political News) अवलंबून आहे. प्रत्येक जण निकाल आपल्याच बाजूने लागेल असा दावा करत आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार यावरुन राजकीय नेत्यांची काळजी वाढली आहे. यातच आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भविष्यवाणीच करुन टाकली आहे आणि दावा केला फक्त आठ दिवसांत सगळं बदलून जाईल.

पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच

चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार शिंदे गटाकडून (Shinde Group) घेतला जाणार नाही असे होऊच शकत नाही. कारण संभाजीनगर मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात काटे की टक्कर आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना भविष्यवाणी केली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एवढंच नाही तर पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

Web Title :-  Maharashtra Political News | The next Chief Minister will be Eknath Shinde, claims MLA of Shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’