Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या घोषणेवरून आणि मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती मिळत आहे (Maharashtra Politics). शिंदे गटाला विचारात न घेताच भाजपने विधानपरिषदचे उमेदवार जाहीर केल्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत उमटल्याचे समजते. (Maharashtra Politics)

विधानपरिषदचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याने शिंदे गटातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. दि. ३० जानेवारीला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली. कोकण शिक्षक मतदार संघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी माजी मंत्री रणजीत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या तीन नावांची अधिकृत घोषणा केली. सध्या राज्यात सत्तेत भाजप आणि शिंदे गट आहे. पण जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये सगळी नावे ही भाजपचीच आहेत. त्यामुळे याबाबत शिंदे गटात नाराजी पसरल्याचे सांगण्यात येत आहे. ( Maharashtra Politics)

यावरून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दादा भुसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट याबाबतचा सवाल विचारला. त्यात त्यांनी कोकण आणि नाशिकची जागा ही शिंदे गटासाठी ठरलेली असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी असे परस्पर उमेदवार जाहीर करणे हे योग्य नसल्याचे दादा भुसे म्हणाले. एवढच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याविषयीची चर्चा मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर सारवासारव केली असल्याचं समजतंय. ( Maharashtra Politics)

दरम्यान, नुकतेच मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी विराजमान झालेल्या देवेन भारती यांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. देवेन भारती यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली असून याबाबत माझ्याकडे बोट दाखवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच या नियुक्तीवरून पोलिस दलात नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ( Maharashtra Politics)

दरम्यान, देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना साईड पोस्टींग देण्यात आली होती.
पण आता सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या देवेन भारती यांची नियुक्ती
थेट मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Politics | disagreement between bjp and shinde group over legislative council candidature and appointment of deven bharti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी