MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आमदारांच्या अपघातांची (Accident) मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यानंतर आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने धडक दिल्याने बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने कडूंना धडक दिली. धडकेत ते रोडच्या डिव्हायडरवर पडल्याने डोक्याला मार लागल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

थंडी व मंद अंधार असल्याने काही समजण्याच्या आतच बच्चू कडू खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अमरावती शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. असे बच्चू कडू यांनी ट्विट केले आहे.

आमदारांच्या अपघाताची तिसरी घटना

एका महिन्यात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. 24 डिसेंबरला भाजप (BJP)
आमदार जयकुमार गोरे यांच्या कारचा अपघात झाला.
4 जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते (NCP) माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी कशेडी घाटात अपघात झाला होता.
त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती.

Web Title :- MLA Bachchu Kadu | maharashtra ex minister bachhu kadu injured in accident collision with a bike while crossing the road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी