Maharashtra Politics News | …तेव्हा भूजबळ, खडसेंना खोके दिले होते का?, शिंदे गटाचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिंदे गटावर (Maharashtra Politics News) टीका केली. त्यांच्या टीकेला शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यातूनच राष्ट्रवादीची निर्मिती झाली. मग जर आम्ही गद्दार असू तर राष्ट्रवादीला देखील गद्दार म्हटले पाहिजे, असा टोला म्हस्के यांनी लगावला.

शरद पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. यानंतर शिंदे गटाने पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसले आणि त्यातून राष्ट्रवादीची निर्मिती केली. आम्ही जर गद्दार असू तर राष्ट्रवादीला देखील गद्दार म्हटले पाहिजे. इतर पक्षातील नेते घेऊनच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. ( Maharashtra Politics News)

नरेश म्हस्के पुढे म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गणेश नाईक (Ganesh Naik),
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राष्ट्रवादीत घेतले त्यावेळी त्यांना खोके दिले होते का?
सुषमा अंधारे (Sushma Andhare), संजय कदम (Sanjay Kadam) हे राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत गेले त्यावेळी त्यांना खोके दिले होते का? तुमच्या व्यासपीठावर
असणारी मंडळी आघाडीत असताना देखील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहे.
आधी त्यांना विचारा आणि नंतर आमच्यावर टीका करा असा हल्लाबोल म्हस्के यांनी शरद पवारांवर केला.

Web Title :-  Maharashtra Politics News | shinde group criticizes sharad pawar eknath khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न