Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शिंदे-फडणवीस गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.(Maharashtra Politics) त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तरीपण हे सर्व मंत्री खुर्चीच्या बुडाला चिकटून बसले आहेत. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) मधील भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

‘पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री असलेले फौजासिंग सरारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते ठेकेदारांकडून वसुली करीत असल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर आणली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तत्काळ मंत्री फौजासिंग यांचा राजीनामा घेतला व चौकशीचे आदेश दिले. हा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर घेतला गेला. पण ही अशी नैतिकता आपल्या महाराष्ट्रात तोळाभर तरी शिल्लक आहे काय?’ असा प्रश्न शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. (Maharashtra Politics)

मुळात महाराष्ट्रात एक सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवर आले व ते रोज अनैतिक कामे करत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली; पण ते सर्व मंत्री आजही निर्लज्जासारखे आपल्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेने ‘सामना’ तून केली आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले होते. गरीबांच्या घरांसाठी ठेवलेले भूखंड हायकोर्टाच्या निर्देशांना डावलून बिल्डरांना बेकायदा विकण्यात आले. जवळपास ११० कोटींचे भूखंड दोन कोटींना बिल्डरांच्या हाती ठेवल्याची जी महाराष्ट्र सेवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्यावर हायकोर्टाने देखील ताशेरे ओढले. पण याबाबत मुख्यमंत्री म्हणतात ‘तो मी नव्हेच’. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गायरान जमिनी बेकायदा पध्दतीने विकल्या. आणि याच सत्तारांनी कृषी महोत्सव अधिकाऱ्यांना १० कोटी रूपये जमविण्याचे टार्गेट दिले होते. हे सर्व काही नैतिकतेस धरून आहे का? असा सवाल देखील यावेळी सामनातून विचारण्यात आला आहे. (Maharashtra Politics)

यात शिवसेनेने भाजप खासदार किरीट सोमय्यांवर देखील निशाना साधला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचा आरोप ठेवून त्यांना खोट्या प्रकरणात तुरूंगात पाठवणाऱ्या केंद्रिय तपास यंत्रणांचा बोलवता धनी आता कोठे आहे? असा सवाल देखील यात करण्यात आला आहे.
तसेच यावर पुढे लिहिले आहे की, सत्तार, शिंद्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन किरीट सोमय्या वगैरे लोक आता ईडी कार्यालयात, न्यायालयात का गेले नाहीत? ‘शिंदे, सत्तार ‘हिशेब’ तर द्यावाच लागेल,’’ असे ते का गरजले नाहीत?
हे धोरण संशयास्पद नाही काय? अनिल परब यांचे रिसॉर्ट वगैरे काही नसताना ते रिसॉर्ट तोडण्यासाठी
हातोडे नाचविणारे हेच लोक मंत्री शंभू देसाईंच्या महाबळेश्वरच्या बेकायदा बांधकामाकडे डोळेझाक करतात.
संजय राठोडांचेही गायरान जमिनीचेच प्रकरण विरोधकांनी समोर आणले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोगस-बनावट डिग्री घेतल्याचा घोटाळा समोर येऊनही सरकारमधील
हxxxx स्वतःस हरिश्चंद्राचे अवतार मानून मंत्रालयात बसले आहेत’, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नैतिकतेचे धडे अधूनमधून देत असतात; पण ती नैतिकता महाराष्ट्रात कणभरही झिरपलेली दिसत नाही, असेही यात लिहिण्यात आले आहे.

Web Title :- Maharashtra Politics | shivsena criticized cm eknath shinde government after corruption allegation on ministers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Pune Crime News | इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार ! गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला, डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल