Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील मुले, नात-नातू व भाऊ -बहीण यांना समक्ष गळा भेट (Video)

पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षा बंद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंद्यांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने शिक्षाबंदी आणि त्यांची १६ वर्षाखालील मुले यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक आहे,जेणेकरून समक्ष भेटीत बंदी व त्यांची मुले यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याने शिक्षणाबाबत व घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकेल ,यास्तव कारागृहात शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील सोळा वर्षाखालील मुलांची समक्ष भेट देण्यात येत होती. (Maharashtra Prisons Implements New Policy)

या कार्यालयाकडून सूचना पत्र व परिपत्रक निर्गमित करून कार्यवाही केली जात होती.

कारागृहातील बंद्यांचे नैराश्य कमी होण्याकरिता व कौटुंबिक परिस्थितीबाबत जाणीव होण्याच्या दृष्टीने तसेच बंदी
व नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद सुलभ व्हावा त्यांच्या समक्ष भेटी सुलभ व्हाव्यात व कारागृह विभागाचे ”
सुधारणा व पुनर्वसन ” या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होणेच्या दृष्टीने कारागृहातील बंद्यांच्या कारागृहाबाहेरील
असलेल्या मुले,नातू-नातू व भाऊ-बहीण यांना प्रत्यक्ष समक्ष भेटी देण्याबाबत नव्याने समावेश करण्यात येत आहे.
यामुळे बंद्यांच्या नात-नातू यांच्या शिक्षणाबाबत व कौटुंबिक अडचणी सोडवण्यास मदत होईल.
मुले,नात -नातू ,भाऊ-बहीण यांची समक्ष भेट,तसेच रक्ताच्या नातेवाईकांचा होणारा मायाळू स्पर्श होऊन
बंद्यास जगण्याची नवी उमेद निर्माण होईल व नात -नातू ,भाऊ-बहीण ,मुले यांनाही बंद्यांविषयी कृतज्ञता वाटून
नवीन ऊर्जा मिळून कारागृह प्रशासनाविषयी आपुलकीची भावना वाढीस लागेल.
याबाबत कार्यवाहीकरिता राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे कारागृहातील बंदी व नातेवाईक यांचेमध्ये निश्चितच समाधानाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण होईल. (Maharashtra Prisons Implements New Policy)

Web Title :-  Maharashtra Prisons Implements New Policy | Meeting of male and female under-trial prisoners and female under-trial prisoners in front of their children, grandchildren and brothers and sisters outside the prison

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

CM Eknath Shinde | प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | अजित पवार म्हणाले ‘कोण संजय राऊत?’, आता राऊत म्हणतात ‘अजित पवार गोड माणूस’