Maharashtra SSC 10th Results 2024 | राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के; मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग सर्वात पुढे, संपूर्ण मार्कशीट येथे पहा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra SSC 10th Results 2024 | यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी आज सकाळी अकरा वाजता जाहीर केला. राज्याचा यंदाचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी आहे ९७.२१ टक्के. तर, मुलांचा निकाल आहे, ९४.५६ टक्के. यंदाच्या परीक्षेत ७२ पैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, असे अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले.(Maharashtra SSC 10th Results 2024)

यंदा दहावीच्या परीक्षेमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९९.०१ टक्के इतका लागला आहे. तर, सर्वात कमी ९४.७३ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

७२ विषयांसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा आठ माध्यमांमधून घेण्यात आली होती. नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातील १५,६०,१५४ विद्याथ्र्यांनी दिली परीक्षा.

२०२३ -२०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ५४४ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.

अधिकृत माहितीनुसार दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

संपूर्ण मार्कशीट पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

वेबसाईटवर कसा पाहाल निकाल, पाहा सर्व टप्पे

  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in संकेतस्थळाला भेट द्या.
  • वेबसाईटवर दहावीच्या निकालाची लिंक दिसेल, तिथं क्लिक करा.
  • इथं लॉगईनसाठी आवश्यक माहितीची पूर्तता करा. नोंदणीसाठी परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव असा तपशील आवश्यक असेल.
  • माहितीची पूर्तता केल्यानंतर पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल ङेरव होईल.
  • निकाल दिसल्यानंतर तो पीडीएफ फाईलमध्ये डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा.

इयत्ता अकरावीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २४ मे २०२४ पासून सुरुवात झाली असून, सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेशप्रक्रियेला आणखी वेग मिळणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Arrest Dr Ajay Taware | धक्कादायक! अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल, क्राईम ब्रँचकडून ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक