Maharashtra ST Employees | विविध मागण्यांसाठी इंटक संघटना आक्रमक; एसटी कर्मचारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना घालणार घेराव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra ST Employees | शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे (Government Employee) एसटी कर्मचाऱ्यांनाही (Maharashtra ST Employees) वेतन भत्ते व थकबाकी मिळावी, यासाठी एसटी इंटक संघटना (ST Intake Organization) आक्रमक झाली आहे. आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi-2023) पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घालून मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांना (DY CM) घेराव घालण्याचा इशारा इंटकने दिला. 1996 पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक वेतन मिळत होते. परंतु मान्यताप्राप्त कामगार संघटनेने 1996 पासून केलेल्या करारात योग्य वेतनवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे (Mukesh Tigote) यांनी केला.

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेला (Maharashtra ST. Trade Unions) मान्यता दिल्यानंतर केलेल्या वेतनवाढीच्या करारांमुळे कर्मचाऱ्यांना (Maharashtra ST Employees) आर्थिक लाभ (Financial Benefits) न देता युनियनच्या फायद्याचे निर्णय घेऊन आर्थिक शोषण होत आहे. तर एसटी कर्मचार्‍यांचा पगार सरकारी कर्मचार्‍यांपेक्षा खूपच कमी आहे. मात्र आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विलीनीकरणाच्या लढाईच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून स्वार्थी राजकारण केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नोव्हेंबर 2021 पासून त्यांना महामंडळातील सेवेचा विचार करून 5000, 4000 आणि 2500 ची पगारवाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी तफावत निर्माण झाली आहे. अनियमित वेतन वाढीमुळे बहुसंख्य कामगारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे पगारातील त्रुटींमुळे अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमध्ये 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 या कालावधीतील एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या करारात अपेक्षित वाढ होणे अपेक्षित होते. मात्र कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे वेतनवाढ झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी अफवा पसरवून खोटे व भूलथापा मारून कामगारांची फसवणूक केली, असा आरोप मुकेश तिगोटे यांनी केला.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

– करारपद्धत रद्द करून एस.टी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन निश्चिती
वेतन व सेवा सवलती तत्काळ लागू केली जावी.

– कर्मचा-यांना घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम तत्काळ अदा केली जावी.

– शासनाप्रमाणे एस.टी कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता व थकबाकीची रक्कम द्यावी.

Web Title :  Maharashtra ST Employees | st employees protest chief minister and deputy chief minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globally