Maharashtra Traffic Rules and Fine | विनाहेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावल्यास वाहनचालकाला आता मोजावे लागणार 1 हजार रुपये?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Traffic Rules and Fine | वाहनचालकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विनाहेल्मेट (Helmet) टुव्हीलर चालवणा-यांना त्याचबरोबर सीटबेल्ट (Seatbelt) लावलं नसल्यास आता एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. विनाहेल्मेट अथवा सीटबेल्ट न लावल्यास त्या वाहनांवर आता 1000 रुपयांचा दंड लावला जाण्याची शक्यता आहे. कारण वाहतुकीसंदर्भात नवे नियम (Maharashtra Traffic Rules and Fine) लागु केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अशी चर्चाही सुरू आहे. नियम धुडकावल्यास मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 (Motor Vehicles Act 2019) अंतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

 

सुत्रांच्या माहितीनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, नवीन मोटर वाहन कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि, किंवा 10 हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे.
तसेच, दुस-या गुन्ह्यासाठी कमीतकमी दोन वर्षे तुरुंगवास आणि, किंवा 15 हजार रुपयांचा दंड (Maharashtra Traffic Rules and Fine) आहे.

 

दरम्यान, आम्ही काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी
तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहे. याबाबत माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले आहे.

फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना 1 हजार रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास,
परमिटशिवाय वाहन चालविल्यास 2 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सुधारित दंडात्मक
संदर्भात अंतिम अधिसूचना सोमवारी येण्याची शक्यता आहे.
तेव्हा वास्तविक दंड आणि शिक्षा नेमकी काय असेल याबाबतची माहिती सार्वजनिक केली जाईल.
अशी माहिती सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title : Maharashtra Traffic Rules and Fine | maharashtra bikers and motorists may be fine 1000 rupees for not wearing helmet and seatbelt possibility of new rules impose from next week

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

Narayan Rane | नारायण राणेंचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवसेनेत परब हे ‘कलेक्टर’ असल्यामुळे…’ (व्हिडीओ)