1 एप्रिलपासून TDS, EPF सह ‘या’ 5 नियमांमध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

पोलीसनामा ऑनलाईनः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. यात आयकर प्रणालीत अनेक मोठे बदल केले असून 1 एप्रिल पासून ते लागू होणार आहेत. अर्थसंकल्पात मध्यम वर्ग किंवा नोकरदार वर्गासाठी कोणताही दिलासा दिला नव्हता. मात्र 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयकर भरण्यातून सूट दिली होती. तसेच आय़कर न भरणाऱ्यांसाठी कडक नियम बनविण्यात आले होते. जाणून घ्या काय आहेत बदल.

ईपीएफवरील व्याजावर लागणार कर
आयकराच्या नव्या नियमांनुसार 1 एप्रिल 2021 पासून वर्षाला 2.5 लाखांपेक्षा अधिक ईपीएफ कापला जात असल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर लागणार आहे. 2 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्यांना याचा कोणताही फरक पडणार नाही

आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी
कर्मचाऱ्यांना सूट देण्यासाठी आणि आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी वैयक्तीक करदात्यांना आता 1 एप्रिल 2021 पासून आधीच भरलेला ITR फॉर्म दिला जाणार आहे. यामुळे Income Tax Return भरणे सोपे होणार आहे.

LTC स्कीम
लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC) व्हाऊचर स्कीम नवीन वर्षात लागू होणार आहे. लॉकडाऊनमुळे ज्या कर्मचाऱ्यांना एलटीसी टॅक्स बेनिफिट मिळू शकला नाही त्यांच्यासाठी ही योजा लागू केली आहे .

ITR फाईल न केल्यास दुप्प्ट टीडीएस भरावा लागणार
ITR फाईल न केल्यास करदात्यांना दुप्पट TDS भरावा लागणार आहे. आयटीआर फाईल न करण्याऱ्यांसाठी हा नियम कडक केला आहे. तसेच त्यांना टीसीएसदेखील जास्त आकारण्यात येणार आहे.

आटीआर भरण्य़ास सूट
सुपर सीनियर सिटीझन्सना ITR फाइल करण्यास 1 एप्रिलपासून सूट दिली जाणार आहे. यासाठी 75 वर्षे वय निश्चित केले असून ही सवलत पेन्शन किंवा एफडीच्या व्याजावर जगणाऱ्या वृद्धांसाठी दिली आहे.