Makar Rashifal 2021 : व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न होतील यशस्वी, जाणून घ्या मकर राशीवाल्यांसाठी कसे असेल नवीन वर्ष

Makar Rashifal 2021 : नवीन वर्ष येण्यास आता काही तासच शिल्लक आहे. अशावेळी प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, त्याच्यासाठी नवीन वर्ष कसे असेल. मकर राशीच्या जातकांबाबत बोलायचे तर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा काळ कसा असेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत –

जानेवारी –
शेयर बाजार आणि सट्टेबाजीचे काम करण्यासाठी योग्य संधी आहे. वैयक्तिक, व्यावसायिक संबंध वाढतील. भविष्यात आणखी काही करण्याची स्थिती असेल. आपले घर, आपला जोडीदार, आपल्या गोष्टी महत्वाच्या असतील. पैशाच्या बाबतीत चांगला काळ आहे. छोटे-मोठे दौरे, संपर्क देखील महत्त्वपूर्ण आहे, एकूणच संमिश्र परिणामांचा काळ आहे. दृष्टीकोनात कठोरपणाची भावना असेल, जी तुम्हाला असहकार्य आणि न झुकण्यासाठी प्रेरित करेल. नरमाईचे धोरण अवलंबल्यास चांगले परिणाम मिळतील.

फेब्रुवारी –
हुकूमशाही स्वभावामुळे आपण आपल्याच लोकांच्या नजरेतून खाली उतराल. व्यवसायात स्थिती ठीक राहील. गुंतवणूकीबद्दल विचार कराल. शुभ कार्य सुरू करण्यासाठी वेळ अद्याप योग्य नाही. अस्वस्थता, अडथळे आणि त्रास असेल. नोकरदार व्यक्तींच्या स्थितीत, कुटुंबातील तुरळक वाद वगळता स्थिती सामान्य असेल. एखाद्या नवीन व्यक्तीच्या सहकार्याने किंवा शेयर, जुगारात आर्थिक लाभ, आपल्या स्वतःच्या हिंमतीवर काम न केल्यास चांगले ठरेल. एखाद्या असहाय माणसाला मदत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांसह बराच वेळ घालवाल.

मार्च-
धार्मिक कार्यात विशेष रस घ्याल. दाम्पत्य जीवनात विनाकारण वाद होऊ शकतो. तर्क-वितर्काची संधी येईल. भागीदारीच्या व्यवसायात काही गोंधळाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. स्वत:च्या मालमत्तेच्या प्रकरणांत सुधारणा होईल. नवीन लाभदायक संबंध तयार होतील. संधीचा फायदा घ्या. कुटुंबात सूख, साधनांची वाढ होईल. शुभ बातमी प्राप्त होईल, प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन काम आणि व्यवसायासाठी उत्सुक असाल. लोभामुळे काम बिघडू शकते.

एप्रिल –
तुमच्यासाठी जीवनाची सूखद बाजू उपलब्ध असेल. ऐषोआराम, कला, शिल्प, मुले तुम्हाला खुप व्यस्त आणि समृद्ध ठेवेल. घराच्या बाबातीत कुटुंब, सासरचे नातेवाईक, दोन्ही बाजूचे नातेवाईक यांच्याशी संबंध सुधारतील. अर्थविषयक बाबी सुधारतील. वैवाहिक जीवनात सौम्य तणाव असेल. कुटुंबाकडून सहकार्याची आशा व्यर्थ आहे. अविवाहित लोकांना अनुकूल प्रस्ताव मिळेल, मध्यस्थांच्या माध्यमातून कार्यसिद्धी होईल. नोकरी, व्यवसायात केलेला प्रवास यशस्वी होईल. ज्येष्ठांशी तडजोड करावी लागेल. बदललेल्या स्थितीमुळे व्यस्तता वाढेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
नोकरी करणार्‍यांना उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. पत्नी आणि मुले सहलीला जाऊ शकतात. कामात यशासाठी प्रयत्नशील व्हाल.

मे-
एखादी मोठी जोखीम घ्याल. एखाद्या अध्यात्मिक व्यक्तीशी संपर्क येईल, जो आगामी काळासाठी चांगला असेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त भांडवल घालावे लागेल. पाहुण्यांचे स्वागत, पार्टी, खाणेपिणे सर्वकाही असेल. पण आरोग्य, घरगुती कार्यक्रम, नित्यक्रमांबद्दल चिंतीत होऊ शकते. नात्यांना अशी दिशा मिळाली आहे की ते सुखाचा अनभुव देतील, एकूणच आयुष्यात सहजतेची भावना राहील. प्रत्येक प्रकारचे संबंध आणि भागीदारी महत्त्वपूर्ण असेल. काम आणि घरातील मागण्यांचा दबाव येऊ शकतो. तथापि, दोघेही समाधान सुद्धा देतील. व्यवसायात नफ्याची नवी सुरूवात होईल.

जून-
यशस्वी व्हाल, सर्वत्र स्तुती होईल आणि काम आणि संबंधांच्या जगतात पुढे जात रहाल. या दृष्टिकोनातून परदेशी संपर्क, अभ्यागत आणि विदेशी मित्र महत्त्वपूर्ण असू शकतात. कामात सर्जनशीलता वाढविण्यासाठी, प्रत्येक संभाव्य मार्गाने प्रयत्न कराल. सर्व प्रकारच्या माध्यमांचा आवश्यकतेनुसार वापर करण्याचा प्रयत्न कराल. प्रियजन आणि जिव्हाळ्याच्या माणसांशी जवळीक वाढेल. तुम्हाला समजले आहे की, आपली कमाई आणि लोकांशी संबंध यांचे थेट नाते आहे.

जुलै-
वैयक्तिकरित्या मार्गातील अडथळे दूर आवश्यकता समजेल. घरगुती आणि कौटुंबिक गरजा भागविण्याशी संबंधित महत्त्वाचे विषय ठरतील. ठरलेल्या कामांमध्ये मेहनत केल्याने कामात यश मिळेल. कोणत्याही नवीन कामात उतावळेपणा चांगला ठरणार नाही. व्यवसाय क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. एखादा नवीन करार फायदेशीर सिद्ध होईल. वैवाहिक जीवनात सौम्य तणाव असेल. एखादे नवीन काम करण्याची संधी मिळेल. परीक्षेत अंशतः यश मिळेल. गरम पदार्थांचे सेवन करणे सोडून देणे चांगले ठरेल.

ऑगस्ट –
काही निश्चित आणि ठोस बदल आवश्यक होतील. भौतिक जगाच्या चिंतेचा सामना करावा लागेल. कोणतेही काम अत्यंत विचारपूर्वक पुढे न्या. देवाण-घेवाण, जुगार यापासून दूर राहा. करियर आणि घरगुती बाबतीत पुन्हा एकदा अत्यंत व्यस्त व्हाल. पण स्थिती कायम नसेल. आपण वैयक्तिक संबंधांवर लक्ष केंद्रित कराल. स्वत:साठी आणि कुटुंबासाठी कपडे आणि दागदागिने, परफ्यूम इ. खरेदी कराल. मंगलकार्यांचाही योग आहे.

सप्टेंबर-
तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या मागणीचा सामना करावा लागू शकतो. सर्वात महत्वाचे असतील प्रिय व्यक्ती आणि कुटुंब. कायदेशीर प्रकरणे, ट्रस्ट, वडिलोपार्जित संपत्ती, भागीदारी, युतीची शक्यता आहे. कामे जास्त असतील आणि ती पूर्ण करण्यासाठी खुप मेहनतदेखील कराल. व्यवसाय किंवा सरकारी नोकरी करणार्‍यांसाठी विशेष शुभ काळ. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाला नवे रूप देण्यात यशस्वी व्हाल. आपल्या क्षेत्रातील एखाद्या तरुण व्यक्तीकडून चांगला लाभ मिळेल. आर्थिक व्यवहारात अडथळे येतील, परंतु एखाद्या मित्राच्या मदतीने काम सुरू होईल.

ऑक्टोबर –
व्यक्तिमत्व आणि प्रतिमा सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करणे, कपडे, सामान, मालमत्ता आणि घर यांचे मुल्यांकन तसेच नव्याने ठिक करण्याचा काळ आहे. नैतिक आधार, मागण्या, दिशानिर्देश आणि प्रेरणा यासाठी पुन्हा कुटुंबाकडे वळाल. आता आपल्याला वास्तव समजले की, आपल्याला नैतिक मूल्ये आणि प्रेरणेच्या बाबतीत कसे राहायचे आहे. आपल्या जीवनात योग्य आचार-विचारांचा अभाव असणार नाही.

नोव्हेंबर –
अनेक अव्हानांना तोंड द्यावे लागेल, मग ते आर्थिक असो की पैशाशी संबंधीत, सावध राहण्याची वेळ आली आहे. मागील फायदे आता वाढतील. इतर लोकांच्या संगतीत सहजता वाटेल आणि त्याचा आनंद घ्याल. मौजमस्ती आणि प्रणयाचा काळ आहे. सावधगिरी बाळगा. आर्थिकबातीत संतुलन ठेवा. घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलु नका किंवा घाईगडबडीत गुंतवणूक करु नका. काम आणि मौजमस्तीमध्ये संतुलन साधण्याची ही चांगली वेळ आहे. आपण त्या जगाला उपयोगी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न कराल ज्यामध्ये तुम्ही राहता.

डिसेंबर –
तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत विचार कराल. एखादी मागील उधारी चुकवणे शक्य होईल. कामात शिथिलता राहील. मानसिक बेचैनी राहील. उत्पन्नाची स्थिती उत्साहदायक राहील. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणुक करू शकता. पत्नी, मुलांच्या बाबतीत समर्पणाची भावना राहील. शेयर तसेच जुगारात लावलेला पैसा काही प्रमाणात परत येईल. संततीच्या बाबतीत निर्णायक स्थितीची शक्यता आहे.