Makar Sankranti 2021 : 14 की 15 जानेवारी ?, जाणून घ्या – ‘मकर संक्रांतीची तारीख आणि शुभ मुहूर्त’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मकर संक्रांती हिंदूंचा प्रमुख सण आहे. पौष मासात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण साजरा केला जातो. यासाठी मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जाईल. मकर संक्रांतीपासूनच ऋतु परिवर्तन सुद्धा होऊ लागते. या दिवशी स्नान आणि दान-पुण्य सारख्या कर्मांना विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे आणि खाण्याचे खास महत्व असते. याच कारणामुळे या सणाला अनेक ठिकाणी खिचडीचा सण सुद्धा म्हटले जाते.

असे मानले जाते की, याच सणाला सूर्यदेव आपला पूत्र शनीला भेटण्यासाठी येतात. सूर्य आणि शनीचा संबंध या सणाशी असल्याने हा खुप महत्वाचा आहे. सामान्यपणे शुक्राचा उदय सुद्धा जवळपास याच काळात होतो, यासाठी येथून सुद्धा शुभ कार्यांना सुरूवात होते. जर कुंडलीत सूर्य किंवा शनीची स्थिती खराब असेल तर या सणाला विशेष पूजा करून ती ठिक करता येऊ शकते.

मकर संक्रांती मुहूर्त

शुभ मुहूर्त : सकाळी 08:03:07 ते 12:30:00 पर्यंत
महाशुभ मुहूर्त: सकाळी 08:03:07 ते 08:27:07 पर्यंत

मकर संक्रांतीला काय करावे?

या दिवशी पहाटे स्नान करून तांब्यात लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्याचा बीजमंत्र जप करावा. श्रीमद्भागवदच्या एका अध्यायाचे पठन करा किंवा गीता पठन करा. नवे धान्य, चादर, तिळ आणि तूपाचे दान करा. जेवणात नव्या धान्याची खिचडी बनवा. जेवणाचा देवाला प्रसाद अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून भोजन ग्रहन करा. संध्याकाळी अन्नाचे सेवन करू नका. या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला भांड्यासह तिळाचे दान केल्यास शनीशी संबंधीत प्रत्येक पीडेतून मुक्ती मिळते.

मकर संक्रांतीचे महत्व

मकर संक्रातीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण सुद्धा म्हटले जाते. मकर संक्रातीच्या दिवशी गंगा स्नान, उपवास, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची उपासना यास विशेष महत्व आहे. या दिवशी करण्यात आलेले दान अक्षय फलदायी असते. या दिवशी शनी देवासाठी प्रकाशाचे दान सुद्धा खुप शुभ असते. पंजाब, यूपी, बिहार आणि तमिळनाडुत हा काळ नवीन पिक कापण्याचा असतो. यासाठी शेतकरी हा दिवस आभार दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. यादिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेली मिठाई वाटली जाते. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे.