Malaika And Arjun Breakup | मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपवर होतोय शिक्कामोर्तब; मलायकाने केले सोशल मीडियावर अनफॉलो

पोलीसनामा ऑनलाइन – Malaika And Arjun Breakup | बी टाऊनमध्ये सध्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची (Malaika Arora And Arjun Kapoor Breakup) चर्चा रंगली आहे. मलायका आणि अर्जुन गेली अनेक वर्षे एकमेंकांना डेट करत आहेत. अनेकदा हे लवली कपल त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसत होते. मात्र सध्या सर्वत्र त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलले जात आहे. अर्जुन कपूरने दुसरी गर्लफ्रेंड पाहिली असल्याचे देखील बोलले जात आहे. अर्जुन सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिला (Kusha Kapila) हिला सध्या डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये सारे काही अलबेल नसून हे आता सोशल मीडियावर देखील सिद्ध होत चालले आहे. मलायकाने केलेल्या सोशल मीडियावरील कृतीमुळे त्यांच्या ब्रेकअपवर (Malaika And Arjun Breakup) शिक्कामोर्तब केला जात आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या लाईफ अपडेट शेअर करते. तिने अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्य़ासाठी खास पोस्ट देखील शेअर केली होती. अर्जुनच्या बर्थ डे पार्टीमधील मलायकाचा डान्स देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता मात्र मलायकाने अर्जुनच्या फॅमिली मेंबरला ऑफिशियल अकाऊंटवरुन अनफॉलो करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिने तिच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला कपूर (Anshula Kapoor), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांना अनफॉलो केले आहे. त्याचबरोबर अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) आणि त्यांचा भाऊ अनिल कपूर (Anil Kapoor) यांना देखील अनफॉलो केले आहे. मलायका अरोरा या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीमुळे तिचे आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चांवर विश्वास बसू लागला आहे. पण मलायका अजूनही अर्जुन कपूरला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

मलायका अरोरा ही तिच्या बोल्डनेसमुळे (Malaika Arora Boldness) आणि अफेअरमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. यावेळी मात्र तिच्या ब्रेकअपमुळे मलायकाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मलायकाने परिधान केलेल्या स्वेटशर्टवरुन देखील ती चर्चिली जात आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पापाराझींना पोज देताना मलायकाने परिधान केलेल्या स्वेटशर्टने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी तिच्या स्वेटशर्टवर ‘Lets fall apart’ म्हणजेच ‘चला वेगळे होऊ या’ असे लिहिले होते. तिच्या या स्वेटशर्टमुळे चर्चेला उधाण आले. मलायका आणि अर्जुन (Malaika and Arjun) हे नेहमी एकत्र फिरताना व इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसत होते. मात्र मुंबईमधील एका इव्हेंटला मलायका एकटीच आली आणि करण जोहरच्या (Karan Johar) हाऊस पार्टीला देखील अर्जुन एकटाच उपस्थित राहिला होता. या पार्टीमधील अर्जुन आणि कुशा कपिला (Arjun Kapoor And Kusha Kapila Affair) यांचे फोटो व्हायरल झाले. तेव्हापासून अर्जुनने आता दुसरी गर्लफ्रेंड पाहिली असून मलायकासोबत ब्रेकअप (Malaika Arora And Arjun Kapoor Breakup) केले असल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | आई पासून दुरावलेला 8 वर्षांचा मुलगा सोशल मीडियामुळे दोन तासात आईच्या कुशीत, मुंढवा पोलिसांची कामगिरी