‘या’ कारणामुळे ‘भारत’ च्या स्क्रिनिंगला अर्जुन-मलायकाची अनुपस्थिती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ‘भारत’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सेलिब्रिटींसाठी आयोजित केलेल्या मेगा स्क्रिनिंगला कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर, अनिल कपूर, संजय लीला भन्साळी, टायगर श्रॉफ, दिशा पटानी असे अनेक कलाकार उपस्थित होते. या सगळ्यांमध्ये फक्त दोघे दिसले नाही. ते म्हणजे सलमानची एक्स वहिनी मलायका अरोडा आणि अभिनेता अर्जुन कपूर !

सध्या मलायका अरोडा आणि अर्जुन कपूर रिलेशनशिप मध्ये आहेत. त्यांच्या नात्याची चर्चा सोशल मिडियावर जोरदार आहे. याआधी मलायका आणि अरबाज खान अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात होते. त्यांचा घटस्फोट झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले.

सलमान ही मलायका आणि अर्जुन यांच्या रिलेशनशिपमुळे नाराज आहे. सलमान वाटत होते की, अर्जुनमुळे अरबाज आणि मलायकाच्या नात्यात दुरावा आला आहे. सलमानच्या भारत चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अरबाज देखील आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तीघे भाऊ उपस्थित होते. म्हणून मलायका स्क्रिनिंगला आली नाही.

त्याचबरोबर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री कतरिना कैफ ब्लॅक कलरचा घागरा घालून आली होती. चित्रपटात कतरिनाच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केले. अभिनेता अनिल कपूर ही स्क्रिनिंगला हजर होता. अनिल कपूर ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात दिसून आला. स्क्रिनिंगला टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ही पोहचली होती. सध्या टायगर आणि दिशा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मिडियावर पसरत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी देखील आला होता. त्यांना ब्लू जीन्स आणि व्हाईट शूज व ब्लॅक टिशर्ट घालून स्क्रिनिंगला पोहचला होता. भारत चित्रपटात सलमानच्या वडिलांची भूमिका करणारा अभिनेता जॅकी श्रॉफ देखील स्क्रिनिंगला आले होते. त्याचबरोबर अभिनेता बॉबी देओलने देखील स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील रेड कलचा सुंदर ड्रेस परिधान करुन स्क्रिनिंगला पोहचली होती.

बॉलिवूडची प्रसिद्द अभिनेत्री तब्बू देखील न विसरता स्क्रिनिंगला आली होती. चित्रपट ‘दे दे प्यार दे’ मध्ये अजय देवगनसोबत दिसून आली. हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला.