Malaika Arora | ‘मी सांगेल ते ऐकतो आणि वागतो…’ मलायकाची बॉयफ्रेंड अर्जूनसाठी खास बर्थ डे पोस्ट, लग्न कधी करणार असा सवाल

पोलीसनाम ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध कपल म्हणजे अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ह्यांचे प्रेमप्रकरण अनेकदा चर्चेत असते. अर्जून आणि मलायका खूप वेळा एकत्र टाईम स्पेंन्ड करताना दिसतात. अभिनेता अर्जून कपूरचा आज वाढदिवस (Arjun Kapoor Birthday) असून त्याने आता वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वत्र सोशल मीडियावर अर्जूनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते आता त्याला बोहल्यावर कधी चढणार असा प्रश्न विचारत आहेत. मलायका आणि अर्जून (Malaika Arora) अनेक वर्षे एकमेंकांना डेट करत आहेत. त्यांचे नाते अगदी जगजाहीर असले तरी ते विवाहबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. (Malaika And Arjun Kapoor Wedding)

 

 

अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) हीचे वय 49 असून ती आजही तितकीच फिट आणि फाईन दिसते. (Malaika Arora Fitness) मलायका आणि अर्जूनची जोडी चाहत्यांची फेवरेट आहे. अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने बॉयफ्रेंडसाठी (Malaika Arora Boyfriend) खास प्रेमाची पोस्ट केली आहे. मलायकाने अर्जूनच्या प्रेमाचे वर्णन करताना सांगितले आहे की, तो माझा अतिशय लाडका आहे असे म्हणत… मी जसे सांगते तसा तो ऐकतो आणि वागतो असे सांगितले आहे. मला शॉपिंगचे प्रचंड वेड आहे. यावेळी अर्जून न थकता माझ्यासोबत असतो. त्यासाठी त्याचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. अशा शब्दात मलायकाने अर्जूनचे कौतुक केले आहे.

 

 

इन्स्टाग्रामवर मलायकानं अर्जूनविषयी लिहिलं आहे की, तो नेहमीच माझ्यासाठी स्पेशल राहिला आहे. त्याचा स्वभाव खूप मदतशील आहे. माझ्यासाठी कायमच एक आशेचा किरण असलेल्या या व्यक्तीविषयी मला खूपच प्रेम आहे. असे लिहित मलायकाने तिच्या प्रेमभावना मांडल्या आहेत. तिच्या या प्रेमळ पोस्टवर चाहते अनेक कमेंटस् करत आहेत.

अभिनेता अर्जून कपूरच्या वाढदिवसानिमित्त पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमधील अभिनेत्री मलायकाचा (Malaika And Arjun Kapoor) व्हिडिओ खूप व्हायरल झाला. यामध्ये मलायका आनंदाने तिच्या छैया छैया या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ‘अर्जूनच्या बर्थडेला मलायकाच्या डान्सने बहार आली’ अशा प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर देत आहेत.

Web Title : Malaika Arora | arjun kapoor birthday malaika arora share insta post viral social media shopaholic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा