‘या’ कारणामुळं भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – उशिरापर्यंत फोन पाहण्याची अनेकांना सवय असते. हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरु शकते. अमेरिकेतील वर्च्यूअल स्लीप पत्रिकेत छापण्यात आलेल्या अभ्यासानुसार, फोनमधून बाहेर येणारे ब्लु लाईट्स पुरुषांची स्पर्म्स क्वालिटी खराब करण्यासाठी कारणीभूत ठरते. या अभ्यासासाठी संशोधकांनी २१ ते ५९ वर्ष वयोगटातील ११६ पुरुषांच्या स्पर्मचे नमुने गोळा केले होते. यासर्वांनाच फर्टिलीटी इवॅल्युएशनच्या समस्येचा सामना करावा लागत होता.

या अभ्यासात सांगितल्यानुसार, गॅजेट्समधून बाहेर पडणारी लाईट आणि स्पर्म्स क्वालिटी यातील संबंध लावण्यात आला होता. त्यात निरोगी पुरुष आणि त्यांच्या फर्टिलिटी फोन रेडिएशनवर अभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया उपकरणांच्या वापरानं प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले. स्मार्ट फोन्स आणि टॅबलेट्समधून बाहेर येणारे लाईट्स स्पर्मच्या गतीशीलतेवर गंभीर परिणाम करतात.

या उपकरणांमधून बाहेर येणारी शॉर्ट वेवलेंथ लाईटचा संपर्क अधिक असतो. इमोटाईल स्पर्मचे प्रमाण जास्त असते. या अभ्यासात दिसून आले की, जास्तीत जास्त झोप घेणाऱ्या तरुणांमध्ये स्पर्मचे काउंट चांगले होते. तसेच जे लोक वेळेवर झोपतात त्यांच्या शरीरातील स्पर्म्स काउंट चांगला असतो. त्याशिवाय जे रात्री उशिरापर्यंत टॅबलेट्सचा वापर करतात. त्यांच्यातील स्पर्म्स कमी होतात, त्यानेच इनफर्टिलिटी वाढते.

स्मार्टफोनच्या वापराने डीएनएला सुद्धा नुकसान पोहचते. त्याने पेशी स्वतःहून आपली क्षमता कमी करतात. स्पर्म्स किंवा एग सेल रेडिएशन गर्भपाताचे कारण ठरू शकते. सामान्य पुरुषांमधील इनफर्टिलिटी २० ते ४० टक्क्यांनी वाढवते. भारतातील सुमरे २४ टक्के पुरुषांना इनफर्टिलीटीचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. तसेच कोणत्याही उपकरणाचा वापर पूर्णपणे बंद करणे योग्य ठरणार नाही. मात्र, झोपेपूर्वी या उपकरणाचा वापर करणे टाळायला हवे.