तुम्ही कधी ‘पाण्याची भजी’ खाल्ली आहे का? Vedio मध्ये दाखवले, एका व्यक्तीने ‘कसे’ बनवले ‘डीप फ्राइड वॉटर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गरम गरम समोसे आणि भज्यांचे नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. परंतू तुम्ही हे ऐकले आहे का? की पाण्यालाही गरम तेलात तळले जाऊ शकते. होय, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले असेल परंतू ही गोष्ट खरी आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक युट्युब व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात काही लोकांनी पाण्याला गरम तेलात तळण्याचे आश्चर्यकारक कृत्य केले आहे.

इंटरनेटवर गाजले ‘डीप फ्राइड वॉटर’
आपले विचित्र खाद्यपदार्थ जसे की मॅगी पाणी पुरी, आयस्क्रीम पराठे आणि न्युडल्स बिर्याणी याबद्दल ऐकले असेल, परंतू आज आम्ही तुम्हाला ‘डीप फ्राइड वॉटर’ नावाच्या भज्यांविषयी सांगणार आहोत. डीप फ्राइड वॉटर आता इंटरनेटवर लेटेस्ट ट्रेंडिंग फूड झाले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत आहेत. डीप फ्राइड वॉटर बनविण्याचा पहिला व्हिडीओ यु ट्यूबवर पोस्ट केला गेला होता, परंतू हा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

केमिकल रिऍक्शनमुळे तयार होतो पाण्याचा बॉल
याचे कारण केमिकल इंजिनियर जेम्स ऑर्गिल हे आहेत. ज्यांनी डिसेंबर २०२० मध्ये तळलेला पाण्याचा बॉल बनविण्याचा प्रयत्न करताना एक व्हिडीओ पोस्ट केला. आश्चर्याची गोष्ट अशी की जेम्स आपल्या पहिल्या प्रयोगात हा आगळा वेगळा पदार्थ करण्यात सफल झाले. या व्हिडिओला जेम्स यांनी आपल्या यु ट्यूब चॅनल ‘द ऍक्शन लॅब’ वर टाकले आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे, युजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

काय आहे ‘डीप फ्राइड वॉटर’?
तुम्ही विचार करत असाल की डीप फ्राइड वॉटर उकळत्या पाण्यासाठी फक्त एक फॅन्सी नाव असेल. परंतू या प्रकरणात असे नाही आहे, याला कॅल्शियम एल्गिनेट नावाच्या एका रासायनिक पदार्थाचा वापर करून बनविण्यात आले आहे. पाण्यात कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम एल्गिनेट या रसायनांच्या परस्पर प्रतिक्रियांमुळे जिलेटीनसारखा पदार्थ तयार होतो, जो दिसायला जेलीसारखा असतो. हे दोन रासायनिक पदार्थ पाण्याला तरल झिल्ली रुपात बनवतात. हे जेली बॉल आणि पारदर्शक दिसते.

सर्वात आधी २०१६ मध्ये झाला होता प्रयोग
डीप फ्राइड वॉटरचा कंसेप्ट पहिल्यांदा २०१६ मध्ये समोर आला होता. फूड ब्लॉगर, शेफ आणि फ्राइड फूडचे प्रशंसक जोनाथन मार्कस यांनी युट्युब पेजवर एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यात त्यांनी पीठ, पैंको क्रेंब्स आणि अंड्यामध्ये रसायनद्वारे तयार केलेल्या जेली वॉटरला गुंडाळून भुईमुगाच्या तेलात तळले. पहिल्या प्रयत्नात ते असफल ठरले, परंतू त्यानंतर डीप फ्राइड वॉटर तयार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यांनी हे घरी न बनवण्याची सूचना केली आहे कारण त्यामुळे प्राणघातक दुर्घटना होऊ शकते.