Mangal Rashi Parivartan : 2021 मध्ये मंगळ ग्रह करणार 7 वेळा राशी परिवर्तन, जाणून घ्या तुमच्या राशीवर किती परिणाम

 पोलीसनामा ऑनलाइन टीम : Mangal Rashi Parivartan – मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. हा सुरक्षेचा सर्वात मोठा ग्रह आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. हा व्यक्तीला धाडस, आत्मविश्वास आणि शक्ती देतो. सोबतच चढ-उतारापासून सुद्धा वाचवतो. मंगळ ग्रहाने जर कुंडलीत राजयोग दिला तर व्यक्ती जीवनात कमी वयात यशस्वी होते. परंतु कुंडलीत मंगळाची दशा खराब झाली तर भयंकर परिणाम समोर येतात.

केव्हा-केव्हा बदलणार चाल
2021 मध्ये मंगळ सातवेळा आपली रास बदलेल आणि प्रत्येक वेळी याचे चांगले-वाईट परिणाम समोर येतील. 22 फेब्रुवारी 2021 ला मंगळाचे पहिले राशी परिवर्तन होईल. यानंतर 2 जून, 20 जुलै 2021, 6 सप्टेंबर, 22 ऑक्टोबर आणि 5 डिसेंबरला सहा अन्य राशीत गोचर होईल. अशाप्रकारे मंगळ एकुण सात वेळा रास बदलेले. 2021 मध्ये मंगळाचे मार्गक्रमण कसे राहणार आहे ते जाणून घेवूयात…

मेष –
मंगळ गोचर 2021 नुसार, व्यावसायिक जीवनात मार्ग शोधाल. हे करियर ग्रोथसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम जोशात पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. बोलणे स्पष्ट आणि मजबूत राहाल. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ –
भौतिक वस्तू मिळवण्याची इच्छा वाढेल. जी मेहनत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल. विवाहित जातक जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवतील आणि आपल्या भावना व्यक्त करतील. हे वर्ष प्रेमसंबंधासाठी चांगले आहे.

मिथुन –
एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम असाल. मात्र कोणत्याही कामात कौशल्य मिळणार नाही. ऊर्जा भरपूर असेल. जास्त वेळी क्रियाशील राहाल. गोष्टी ओळखणे आणि निष्कर्ष काढण्यात चांगले राहाल, ज्यामुळे कामाच्या आघाडीवर मदत मिळेल. मित्र आणि आप्तांसोबत छोट्या प्रवासाला जाऊ शकता.

कर्क –
आव्हानांना तोंड देण्याची ताकद असेल. महत्वाकांक्षी आणि भावनिक राहाल. लक्ष्य प्राप्तीसाठी पूर्ण प्रयत्न कराल. कुटुंबात एक संरक्षक म्हणून काम कराल. कुटुंबासाठी एखादा धोका दिसला तर प्रत्येक प्रकारे सहायतेसाठी प्रयत्न कराल.

सिंह –
ही ग्रहस्थिती सिंह राशीसाठी खुप शुभ आहे. या दरम्यान मंगळ आणि सूर्य दोन्ही क्षमता मिळतील, म्हणजे या कालावधीत दुसर्‍यांवर वर्चस्व मिळवाल आणि क्रियाशील राहाल. धन-व्यापारात सर्व चांगले असेल. नैसर्गिक सौंदर्य असलेल्या स्थळांना भेट द्याल.

कन्या –
मंगळ गोचर 2021 नुसार, तुम्ही परफेक्शनिस्ट प्रमाणे या काळात काम कराल. शॉर्टकट घेणार्‍या लोकांपासून दूर राहा. आपली कामे चांगल्या प्रकारे कराल. चांगल्या योजना बनवाल. कामाचे ठिकाण सुव्यवस्थित ठेवणे पसंत कराल. आरोग्याबाबत चिंतेत राहाल, यासाठी दिनचर्येत व्यायामाला स्थान द्या.

तुळ –
आकर्षण आणि उदारतेने लोकांना प्रभावित कराल. खुप दयाळू व्हाल आणि दान-पुण्यावर विश्वास ठेवाल. विविध सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. यामुळे शोती आणि आनंद मिळेल. मात्र, खर्च वाढेल, यासाठी व्यवस्थापन शिकावे लागेल. यावर्षी वादात पडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक –
मंगळ गोचर 2021 च्या भविष्यवाणीनुसार, या काळात व्यक्तीमत्व जादुई होईल. आजू-बाजूच्या लोकांमध्ये लोकप्रीयता मिळेल. विशेषकरून विरूद्ध लिंगी लोक पूर्णपणे आकर्षित होतील. इच्छा भरपूर असतील आणि प्रत्येक गोष्टी सविस्तर जाणून घ्याल. प्रत्येक गोष्टीबाबत तुमचे विचार आणि ज्ञान स्पष्ट असेल आणि वस्तू आणि स्थितीचे मूळ जाणण्यात हरवलेले असाल.

धनु –
मंगळ गोचर 2021 नुसार, नवीन मित्र बनवाल. विविध संस्कृतीच्या लोकांसोबत चर्चा कराल. मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत एखाद्या प्रवासाला सुद्धा जाऊ शकता. मात्र, यावेळी राग उच्च असल्याने स्वाभाव आक्रमक होऊ शकतो. व्यावसायिक दृष्ट्या सर्व सूत्र तुमच्या कामावर अवलंबून असतील.

मकर –
या दरम्यान जमिनीवर राहाल आणि स्वाभावाने नम्र असाल. यामुळे प्रियजनांना खुप चांगले वाटेल. मजबूत इच्छाशक्ती आणि लक्ष्य प्राप्त करण्यासाठी उच्च संकल्प असेल. योजना बनवण्यात आणि व्यावसायिक जीवनात लक्ष्य प्राप्त करण्यासाठी चांगली रणनीती बनवाल. अशाप्रकारे भौतिक योजना अतिशय मजबूत असतील.

कुंभ –
मंगळ गोचर 2021 नुसार, प्रगतिशील व्हाल. गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी तत्पर असाल. या काळात कुणी नियंत्रित करणे किंवा एखाद्या नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला तर विद्रोही सुद्धा होऊ शकता. वायुतत्वाप्रमाणे तुम्ही मुक्तप्रवाहाच्या उर्जेसह कोणतेही काम करण्यावर विश्वास ठेवाल.

मीन –
प्रियजनांच्या प्रति प्रेम आणि सहकार्य राहील. तणाव आणि दबावाला दूर करण्यासाठी काही रचनात्मक तंत्रांचे पालन कराल. जल आणि अग्नीसंबंधी विविध ऊर्जांमुळे थोडे भ्रमीत आणि अस्वस्थ वाटेल. अनेकदा राग जास्त असेल तर अनेकदा धैर्याने काम करण्यावर विश्वास दाखवाल. याकाळात कला आणि संगीतकडे कल असेल. याशिवाय स्वताला व्यक्त करणे आणि लिहिण्याची कला खुप चांगली राहाणार आहे.