Manikchand Oxyrich Packaged Water | माणिकचंद ऑक्सिरिच आता नव्या रुपात ! पाण्याची ग़ुणवत्ता कायम ठेवून बॉटल नव्या लाल रंगात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिण्याच्या पाण्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले नामांकित माणिकचंद ऑक्सिरीच पॅकेज्ड वॉटर आता वेगळ्या रुपात समोर आले आहे. पुर्वी निळ्या रंगाचे लेबल असलेल्या कंपनीच्या पाण्याची बाटली आता लाल आणि पांढर्‍या रंगातील नाविन्यपूर्ण बोधचिन्ह व आकर्षक लेबलच्या स्वरुपात ग्राहकांना पाहायला मिळत आहे. या नव्या बदलांमुळे माणिकचंद ऑक्सिरीचप्रमाणे पाण्याच्या बाटलीची कॉपी करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या गैरप्रकारांना लगाम बसणार आहे.

भारतातील नामांकित पॅकेजड् वॉटरमध्ये माणिकचंद ऑक्सिरिज हा आघाडीवर असलेला ब्रॅन्ड आहे. 2000 पासून ग्राहकांना गुणवत्ता आणि ऑक्सिजनयुक्त पाण्याचा पुरवठा करणार्‍या या कंपनीच्या बाटलीचे लेबल निळ्या रंगाचे होते. मात्र, माणिकचंद ऑक्सिरिच कंपनीची बाजारात असलेली ओळख लक्षात घेऊन सुमारे ५०० लोकल कंपन्यांनी ऑक्सिरिच प्रमाणे नामसाधर्म्य आणि बाटलीला निळेच लेबल लावून स्वतःचे नकली ब्रॅन्ड बाजारात आणले होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता कंपनीने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माणिकचंद ऑक्सिरिच पाण्याच्या बाटलीला असलेले निळ्या रंगाचे लेबल बदलून त्याऐवजी आता लाल व पांढर्‍या रंगाच्या लेबलमध्ये नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर आणले आहे. त्यामुळे खरी ऑक्सिरिचची बाटली ओळखणे सहज सोपे होत आहे. तर बनावट कंपन्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे आता नव्या रुपातील माणिकचंद ऑक्सिरिचची कॉपी करणार्‍यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. जे. डब्ल्यू. मॅरियट हॅाटेल येथे आयोजित कार्यक्रमास ॲाक्सिरीचचे देशभरातील वितरक व फ्रॅंचाईजी, शिवाय प्रतिथयश उद्योजक उपस्थित होते.

माणिकचंद ऑक्सिरिचने नेहमीच ग्राहकांना गुणव्वतापुर्ण पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर कायम विश्वास ठेवला असून त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आता कंपनीने केलेला नविन बदल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला पडले अशी खात्री आहे.

जान्हवी धारीवाल-बालन, अध्यक्षा, आरएमडी ग्रुप