Manoj Jarange Patil | मुख्यमंत्र्यांना रोखतंय कोण? आत काहीतरी शिजतंय, मनोज जरांगेंनी व्यक्त केली शंका, मोदींबाबत केले ‘हे’ वक्तव्य

जालना : Manoj Jarange Patil | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणार असे म्हटले. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र काहीतरी आत शिजत आहे. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? हा प्रश्न आहे, अशी शंका मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Andolak) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) दिलेल्या शब्द न पाळल्याने मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आरक्षणासाठी बैठक घेण्याची गरजच नाही. त्यांनी फक्त एक फोन केला तरी मराठ्यांना लगेच आरक्षण मंजूर होईल.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळमळ दिसते आहे. मात्र काहीतरी आत शिजत आहे. नाहीतर त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली नसती. १०० टक्के मला खात्री आहे. मी उगाच कुठलेही आरोप करत नाही.

जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, सरकारला गांभीर्य असते तर ४१ वा दिवस उजाडलाच नसता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणीतरी अडवत आहे हे खरं आहे. कारण इतके दिवस मराठा आरक्षणासाठी लागलेच नसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोर-गरीबांची जाण आहे. आम्ही त्यांनाही साद घातली होती.
पण अद्याप त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांना आमची जाणीव नसावी.

जरांगे म्हणाले, सरकारच्या प्रतिनिधींकडून फोन आलेला नाही. गिरीश महाजनांचा (Girish Mahajan) परवा फोन आला,
पण कार्यक्रमात असल्याने उचलता आला नाही. त्यांच्याशी चर्चा करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आम्ही सन्मान करतो.
मात्र मराठ्यांना आरक्षण देण्यापासून त्यांना कोण अडवतंय हे आम्हाला शोधायचे आहे.
मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात ही त्यांची ख्याती आहे. मात्र आम्हाला लेकराबाळांची काळजी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुन्या भांडणाच्या वादातून हडपसरमध्ये 22 वाहनांची तोडफोड, तिघांना अटक (Video)

Sambhajiraje Chhatrapati Meet Manoj Jarange Patil | संभाजीराजेंनी तातडीने घेतली जरांगे यांची भेट, म्हणाले – मला एका गोष्टीची भीती वाटतेय…