Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगेंचे मराठ्यांना आवाहन, देवेंद्र फडणवीसांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची!

लातूर : Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | जेसीबीवरून फुलं टाकली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर फुले पडली नाहीत, त्याला आम्ही काय करावं? एसआयटी नेमली पण अजून आली नाही, कुठे हिंडती? देवेंद्र फडवणीस यांनी अशीच दडपशाही सुरू ठेवली तर पुन्हा एकदा ६ करोड मराठ्यांनी एकत्र यायचे आहे. फडणवीस यांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले. ते आज लातूरच्या निलंगा येथील सभेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) ओबीसीतून पाहिजे. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळणार होते. पण देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकले. १० टक्के आरक्षणाचा घाट घातला. मराठा समाज २७ टक्के आरक्षणात का घेतला नाही? २०१८ ला फडणवीसांनी डाव टाकला आणि १३ टक्के आरक्षण दिले. मराठ्यांनी उपकार ठेवले आणि १०६ आमदार निवडून दिले. पण ते आरक्षण रद्द झाल्याने अनेक मुले निवड होऊन रडत आहेत.(Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis)

मनोज जरांगे म्हणाले, मी अगोदर सांगत होतो, ते आरक्षण टिकणार नाही. फडवणीस यांनी एक दगडात दोन पक्षी मारले. आता दिलेल्या आरक्षणावर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. यांना वाटले या १० टक्के आरक्षणामुळे मराठे खुश होतील. माझ्यावर मग दबाव आणला गेला. मला १० टक्के आरक्षण घ्यावे असे मी सांगावे.

मी करोडो मराठ्यांचे वाटोळे करू शकत नाही. मी सत्ता आणि मराठामधील काटा आहे. पण मी निष्ठावंत आहे. माझे इकडे ठरले तर त्यांना माहीत होते. पण मला त्यांच्याकडे काय ठरते ते माहीत होते. आमची काही माणसे त्यांनी फोडली आहेत, असा आरोप जरांगे यांनी पुन्हा केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पुढे म्हणाले, आपल्याला आता हे अंगावर घ्यावे लागेल.
झालेल्या गोष्टीचा हिशोब होणार. मग मीच निघालो सागर बंगल्यावर. मला म्हणाले या आणि सागर बंगल्याचे दार लावून घेतले.

त्यांनी अर्थसंकल्प अधिवेशन बोलावले आणि त्यात मला अटक करा हाच धिंगाणा. १७ दिवस पोटात अन्न नव्हते.
चीडचीड होते, पण मी माफी मागितली. फडवणीस यांनी माझ्यासोबत आठ दिवस उपोषण करावे.
तुमची ढेरी कमी होईल, अशी खोचक टीका जरांगे यांनी केली.

जरांगे पुढे म्हणाले, अंतरवालीमध्ये आमच्या आई-बहिणीच्या डोक्याची चिंधड्या झाल्या.
त्यांच्यामध्ये आई नाही दिसली का? फडवणीस तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागणार आहे.
मी माझी राखरांगोळी करतो नाही तर पुढच्याची करतो.
एसआयटी कुणाची लावता? देशात पहिल्यांदा आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावली गेली.

गिरीश महाजनांवर बोचरी टीका करताना जरांगे म्हणाले, माझ्या घरावर १३ पत्रे आहेत ते नेतू का नागपूरला?
ज्यांच्याकडे मोटार सायकल नव्हती ते दीड करोड रुपयांच्या गाडीत फिरतात. ते एक डबडे गिरीश महाजन,
म्हणतो आम्ही त्याचे खूप लाड केले. १५ रुपयांचा बेल्ट आणून चड्डी वर करीत हिंडते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | खुनाच्या गुन्ह्यतील सराईत गुन्हेगाराला पिस्टलसह अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई