Manoj Jarange Patil On Maratha Reservation | एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला, फोन करणाऱ्या मंत्र्याला सुद्धा जरांगेंनी टाळले?

मुंबई : Manoj Jarange Patil On Maratha Reservation | आरक्षण देणार असतील तर आम्ही बोलू, आरक्षण देणार नसतील तर नाही बोलणार. एक घंटा वेळ वाढवून मिळणार नाही, तो विषय उद्यापासून संपला. आजचा दिवस आणि रात्र एवढा वेळ त्यांचा आहे. सरकारकडून वेळ वाढवून मागितला जाणार असल्यास आम्ही १ घंटाही वेळ देणार नाही, असे रोखठोक शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) फोन केला होता. मात्र, जरांगे पाटील यांच्याकडे फोन नसल्याने त्यांचे बोलणे झाले नाही, असे सांगण्यात आले. जरांगे यांच्याकडे फोन नव्हता की त्यांनी मंत्र्यांना टाळले अशी चर्चा देखील सुरू आहे. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठी सरकारने ३० दिवसांची वेळ मागितली होती. मराठा समाजाने ४० दिवस दिले. आज २४ ऑक्टोबरला ही वेळ संपली आहे. तरीही सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची माहिती देताना म्हटले की, कुठल्याही परिस्थितीत सरकारला वेळ वाढवून
दिला जाणार नाही. आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत.
आज किंवा उद्या कोणतीही घोषणा झाली नाहीतर तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार.

मनोज जरांगे यांनी आंदोलनाची रूपरेषा सांगताना म्हटले की, उद्यापासून नेत्यांनी आमच्या गावात यायचे नाही,
आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचे नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही.

सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले, आज दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे, त्यांना जे काही करता
येईल ते त्यांनी करावे. त्यानंतर, त्यांच्याकडे वेळ नाही, पुन्हा आमच्या दारात यायचे नाही, यायचे तर आरक्षणच घेऊन यायचे.

मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना जरांगे म्हणाले, शब्द पाळणारे म्हणून समाजात तुम्हाला मानले जाते.
त्यामुळे, शब्दाला जागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आज संध्याकाळपर्यंत आरक्षण द्यावे. मुख्यमंत्र्यांनी पदापेक्षा शब्दाला जास्त किंमत द्यावी.

जरांगे म्हणाले, उद्यापासून माझे उपोषण सुरू होत आहे. तत्पूर्वी आज मी चौंडी येथे जाऊन धनगर समाज बांधवांची
भेट घेणार आहे. धनगर समाज बांधवांना भेटून मला लगेच परत यायचे आहे. कारण, उद्यापासून उपोषण सुरू होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल’

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा