Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल’

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis | शिवसेना खासदार (Shivsena UBT Leader) संजय राऊत यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणावरून (Pune Drug Case) राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दसऱ्याचा मुहूर्तसाधून हल्लाबोल केला आहे. ड्रग्ज माफियांना तुरूंगातून पळवून लावलं जातंय, आणि श्रीरामाची घोषणा कसली द्यायला सांगताय, श्रीराम धनुष्यबाणाने तुमचा वध करेल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

खासदार संजय राऊत म्हणाले, ड्रग्जचा रावण आजूबाजूला फिरतोय आणि श्रीरामाची बाता तुम्ही करता. आधी ड्रग्जच्या रावणाला संपवा मग श्रीरामाचे नाव घ्या. ड्रग्जचे हफ्ते राज्यकर्त्यांपर्यंत जात आहेत. ड्रग्जसाठी राजकीय यंत्रणांना वापरली जात आहे. ड्रग्जमाफियांना तुरुंगातून पळवून लावले जात आहे. देवेंद्र फडणवीस, जय श्रीरामची घोषणा द्यायला काय सांगता, श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

संजय राऊत म्हणाले, आज रावणाला जाळण्याचा दिवस. रावण हा विद्वान शिवभक्त होता. पण अत्यंत अहंकारी होता. अहंकाराने त्याचा नाश झाला. राम सत्याचे प्रतिक होता, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही श्रीरामाच्या सत्याचे प्रतिक आणि महाराष्ट्र आणि दिल्लीत जो अहंकार समोर दिसतोय त्याचा नाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा आज आहे. तो त्यासाठीच आहे. पुढील दिशा देणारा. अहंकाराचा नाश होईल. २०२४ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दिल्ली आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते व्यासपीठावर बसलेले असतील हे तुम्हाला खात्रीने सांगतो.

राऊत यांनी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले ते म्हणाले, गुजरातमधून ड्रग्ज कसे येते, कुणाच्या संरक्षणात येते? पोलीस, गृहमंत्रालय कुणाकडे आहे? महाराष्ट्रातील ड्रग्जच्या रावणाचा अंत करावा लागेल. उडता पंजाब, उडता गुजरातनंतर आता उडता महाराष्ट्र करायचा आहे का?

महाराष्ट्राला केनिया, नायजेरियाच्या दिशेने घेऊन जायचे आहे का? सर्वात मोठे ड्रग्ज व्यापाराचे हब बनवायचे आहे का? इथले उद्योग गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्रात ड्रग्ज पाठवायचे. हे महाराष्ट्राला संपवण्यासाठी कट रचला जात आहे.

राऊत म्हणाले, आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या. देवेंद्र फडणवीसांना कंठ फुटला आहे. मी जबाबदारीने बोलतोय, गरब्याला फिरत असतात. त्यांनी गर्जना केली, देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा, मग याआधी कधी बोलत नव्हता. मग जी मुले श्रीराम बोलत आहेत, त्यांच्याकडे रावणाकडून ड्रग्ज पोहचले जात आहे ते बंद करा.

राऊत पुढे म्हणाले, पंचवटी रामाची, त्याठिकाणीच सगळ्यात जास्त ड्रग्जचा व्यापार सुरू आहे.
पैठण तीर्थक्षेत्र तिथे २५०-३०० कोटींचे ड्रग्ज सापडले. नागपूरमध्ये ड्रग्ज मिळत आहे. पुणे-मुंबईत हजारो कोटींचा
ड्रग्ज व्यवसाय सुरू आहे. मग बच्चा बच्चा जय श्रीराम काय बोलत आहेत. ते श्रीराम बोलतील पण तुमचे ड्रग्ज घेऊन नाही.

राऊत म्हणाले, शिवसेना एकच आहे, दसरा मेळावाही एक आहे. मेळावे खूप असतात, शरद पवार, पंकजा मुंडे,
मोहन भागवत असे मेळावे आहेत. बाडगा जरा मोठ्याने बांग देतो. नपुंसक असतो तो जरा जास्त कांदे खातो.
आझाद मैदानात बाळासाहेबांसमोर फोटो लावलेत. चेहरा पाहिला तर पोटात कळ आल्यासारखा आहे.

मुख्यमंत्र्यांवर प्रहार करताना राऊत म्हणाले, बाळासाहेबांसोबत फोटो लावताय, आमचीही कधी हिंमत झाली नाही.
उद्धव ठाकरेंनीही लावले नाहीत. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. ही फडफड शेवटची आहे.
तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. हे डुप्लिकेट आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु

Pune Katraj Kondhwa Road | उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने कात्रज – कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग झाला सुकर