Manoramabai Ganeshpure Passes Away | अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या मातोश्रींचे निधन; मरणोत्‍तर नेत्रदानाचा घेतला निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन : Manoramabai Ganeshpure Passes Away | प्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांचे मरणोत्‍तर नेत्रदान करण्‍यात आले आहे. त्यांच्यावर सायंकाळी रहाटगाव येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत. भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्‍या रहाटगाव येथील राहत्या घरी मनोरमाबाई यांनी आपला अखेरचा श्‍वास घेतला. (Manoramabai Ganeshpure Passes Away)

‘चला हवा येऊ द्या’ या दूरचित्रवाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून अभिनेते भारत गणेशपुरे यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ते मूळचे अमरावती जिल्‍ह्यातील आहेत. आपल्या आईच्या निधनाची बातमी समजताच भारत गणेशपुरे हे तातडीने मुंबई‍हून अमरावतीकडे रवाना झाले. मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्‍यास दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे आणि मुंबई येथील दिग्‍दर्शक विराग वानखडे यांनी भारत गणेशपुरे यांना प्रेरित केले. (Manoramabai Ganeshpure Passes Away)

या घटनेमुळे गणेशपुरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीदेखील गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उदात्‍त हेतूने गणेशपुरे कुटुंबीयांनी मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्यास समंती दिली. यानंतर दिशा इंटरनॅशल आय बँकेच्‍या चमूने मनीष गणेशपुरे यांच्‍या निवासस्‍थानी पोहचून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे, डॉ. मनीष तोटे, हिमांशू बंड, अंकुश आंबेडकर आदी उपस्थित होते. तसेच नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्‍याबद्दल दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्‍या अध्‍यक्ष कुंदा अरूण गावंडे, स्‍वप्निल गावंडे यांनी गणेशपुरे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

Web Title : Manoramabai Ganeshpure Passes Away | actor bharat ganeshpure mother passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे