मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा ‘PM’ रिपोर्ट आला समोर, मृत्यू पाण्यात बुडूनच?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अखेर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. NIA च्या हाती हा अहवाल लागला असून हिरेन यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे यात स्पष्ट केले आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पण त्यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

यापूर्वीही हिरेन मृत्यू प्रकरणाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसेच चेह-याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली होती. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचेही अहवालात स्पष्ट झाल आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवाल उपस्थित केला होता. दरम्यान दक्षिण मुंबईत स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. एनआयएच्या टीमने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा कार आपणच चालवत होतो अशी कबुली सचिन वाझेंनी एनआयए चौकशीत दिली आहे.