Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या

नांदेड : Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईकडे निघाले असून तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अरविंद बालाजी भोसले (रा. थुगाव. नांदेड) या २२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Maratha Reservation )

मृत्यूपूर्वी अरविंद भोसले योन लिहिलेला मजकूर खुपच भावनिक आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मृत अरविंद भोसले हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. नोकरी नसल्याने तो मिळेल ते काम करून घराला हातभार लावत होता. त्याचे आई-वडीलसुद्धा मोल मजुरी करून पोट भरतात.

मृत अरविंद हा गावातील मराठा आरक्षण आंदोलनात नेहमी सहभागी होत असे. जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी निघण्याची देखील त्याने तयारी केली होती. मात्र, तत्पूर्वीच त्याने बुधवारी रात्री गावातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी अरविंदने चिठ्ठी लिहली असून यात म्हटले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, नाही तर
माझ्या मरणाला अर्थ राहणार नाही. एक मराठा लाख मराठा, असे त्याने शेवटी लिहिले आहे.
मागील सहा महिन्यातील नांदेड जिल्ह्यातील ही मराठा आरक्षणाची सातवी आत्महत्या आहे.
यामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solar Power Project of Pune Metro | पुणे मेट्रोच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन, प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू

दिवसा घरफोड्या करणाऱ्या परराज्यातील टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Police MPDA Action | जनता वसाहत मधील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 96 वी कारवाई

देहूरोड येथे साडे 11 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक

Manoj Jarange Patil | मोठी बातमी! मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंना पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे म्हणाले…

पिंपरी : विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, पिस्टल व काडतुस जप्त

VBA Leader Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली वेगळीच भीती, ”जरांगेंनी पंगतीत जेवावे, कारण…”