Maratha Reservation in Maharashtra | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार ! सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार

मुंबई : Maratha Reservation in Maharashtra | मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य शासनाची (Maharashtra State Govt) पुनर्विचार याचिका (Review Petition) फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका – Curative Petition) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्यात यावे असेही ठरले. (Maratha Reservation in Maharashtra)

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) , बंदरे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), तसेच आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar), माजी न्या. एम जी गायकवाड (Former Justice MG Gaikwad), महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ (Birendra Saraf), अ‍ॅड. विजय थोरात (Vijay Thorat), अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे. (Maratha Reservation in Maharashtra)

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे Sumant Bhange (IAS) म्हणाले की,
मराठा समाजाच्या ३१०० उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे.
सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

Web Title :-  Maratha Reservation in Maharashtra | Maharashtra Government’s determination to give reservation to the Maratha community! A curative petition will be filed before the Supreme Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

CM Eknath Shinde | प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | अजित पवार म्हणाले ‘कोण संजय राऊत?’, आता राऊत म्हणतात ‘अजित पवार गोड माणूस’