Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | मागील चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Jalna Police Lathi Charge) केलेल्या लाठीहल्ल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी (Maratha Reservation) भेट दिली. यावेळी यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, आज उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ (Delegation) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून जालन्याकडे निघण्यापूर्वी औरंगाबाद विमानतळावर (Aurangabad Airport) शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला आहे.

राज्य सरकारच्या (State Government) शिष्टमंडळामध्ये भाजपचे (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील आहेत. माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आम्ही उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. मात्र या सर्व गोष्टींकडे थोडी सबुरी ठेवावा लागेल असे महाजन यांनी म्हटले आहे.

सोमवारी बैठकीत निर्णय झाला आहे. कॅबिनेट होऊन लगेच निर्णय होणार नाही. मनोज जरांगे पाटील यांना सांगण्यासाठी आलो आहे. त्यांच्या मागण्यांवर एक महिन्यात निर्णय होईल, तेवढा अवधी दिला पाहिजे. काल एक उच्च बैठक झाली, त्यात अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे लवकरच प्रश्न सुटेल, पण थोडा वेळ लागणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाजन पुढे म्हणाले, हा सर्व विषय अध्यादेश काढला किंवा बैठक घेतली असा नाही. आम्ही दिलेले आरक्षण टिकवलं होतं.
यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात तो निर्णय टिकवता आला नाही.
मात्र आमचं सरकार न्याय देणारं आहे. याबाबत समिती नेमून तीन महिने झाले, थोडा वेळ लागतो.
पण थोडी सबुरी ठेवावी लागेल. एक महिन्याचा वेळ हवा आहे, जरांगे पाटील यांची समजूत काढणार आहे,
असंही महाजन यांनी सांगितलं

खडसेंची मस्ती जिरली नाही का?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी भाजपवर टीका केली होती.
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती असून, त्यांना मस्ती आली आहे असे खडसे म्हणाले होते.
खडसे यांच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, आमची मस्ती काढता, खडसे यांची मस्ती जिरली नाही का?
तुमची काय अवस्था झाली आहे. तुम्ही सत्ता सर्वात जास्त भोगली असून लोकांनी तुमची मस्ती उतरवली आहे,
अशी टीका महाजन यांनी खडसेंवर केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | भोर आणि वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवा