Maratha Reservation | राज्य सरकारकडून ‘सगेसोयरे’ अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maratha Reservation | ‘सगेसोयरे’ (Sage Soyare) अधिसूचना अंतिम करण्यासाठी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपले उपोषण पुन्हा सुरु केले होते मात्र सरकारकडून शिष्टमंडळाने भेट देऊन चर्चा केल्यानंतर एक महिन्यासाठी हे उपोषण स्थगित केले आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

या समितीने आतापर्यंत मराठा समाजाच्या ५७ लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत. अशा नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही नातेसबंध तपासून कुणबी दाखले देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य करीत यासंबंधीच्या अधिसूचनेचा मसुदा हरकती व सूचनासाठी प्रसिद्ध केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत ही अधिसूचना अंतिम होऊ शकली नाही.

त्यामुळे ही निवडणूक संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. अखेर सहा दिवसानंतर गुरुवारी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यांनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. सगेसोयरे अधिसूचना अंतिम करण्याबरोबरच आंतरवाली सराटी आणि अन्य ठिकाणी आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत या सबंधी कायदा करावा आदी मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने जरांगे पाटील यांना १३ जुलैपर्यंत वेळ मागितली आहे.

उपोषण सुटताच राज्य सरकार जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे व सबंधित अधिकाऱ्यांना सह्याद्री अतिथीगृहावर पाचारण करत त्यांच्याकडून सगेसोयरे अधिसूचना अंतिम करण्याबाबत सुरू असलेले कार्यवाहीची माहिती घेतली.

त्यावर या अधिसूचनेच्या मसुद्यावर ८ लाख हरकत व सूचना आल्या. त्यावर ६ लाख हरकती व सूचना याची नोंद घेण्यात आली असून अद्याप २ लाख हरकती व सूचनांचे विश्लेषण करणे, त्या नोंदवून घेऊन त्यावरील प्रक्रिया शिल्लक आहे. आचारसंहितेमुळे हे काम शिल्लक राहिले आहे. तसेच मराठवाड्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला दाखले देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले. त्यासाठी आवश्यक असेल तर अतिरिक्त कर्मचारी घेण्यास सांगितले. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी जरांगेना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकार अधिसूचना अंतिम करण्याचे संकेत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा; भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना

Home Loan | SBI ने दिला जोरदार धक्का… महाग झाले कर्ज, आता भरावा लागेल जास्त ईएमआई

Pune Drug Case | पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग, कुरकुंभच्या कारखान्याची ड्रग्स तस्करीची लिंक परदेशात

Bajaj Housing Finance | येत आहे बजाज ग्रुपचा आणखी एक मोठा IPO, कागदपत्रे SEBI कडे जमा… जाणून घ्या डिटेल्स

Police Constable End Life Due To Wife | पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट जप्त