Maratha Reservation | मराठा आरक्षण : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद!

नवी मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी २५ तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू झाले आहे, तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. आज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व माथाडी कामगारांनी एकत्रित येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Navi Mumbai Agricultural Produce Market Committee) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maratha Reservation)

नवी मुंबई एपीएमसी मार्केट आज बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि इतर वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. कारण फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केटसह सर्व मार्केट बंद राहणार आहे. नरेंद्र पाटील (Narendra Patil) आणि आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी सर्वानुमते निर्णय घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची तीव्रता राज्यात वाढू लागली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारविरोधात संतापाची भावना आंदोलकांमध्ये आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करून मनोज जरांगे यांना समर्थन दिले जात आहे.

काल मराठा आरक्षणासाठी एका दिवसात दोन तरूणांनी आत्महत्या केल्याने आंदोलक अधिक संतप्त झाले होते.
काल सकाळी काही आंदोलकांनी वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
नेत्यांना गावबंदी करण्यात येत असल्याने आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला आहे. सुमारे ४०० गावात साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे.
तर, अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे, आगामी काळात मराठा आरक्षण आणखीच तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आवाहन
देखील करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा ग्रामीण भागात जास्त तापला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण