मराठा आरक्षण :  मराठा आरक्षणासाठी पुरंदरमधील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या 

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले असून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.३) घडली.
[amazon_link asins=’B01N9QZ0TR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’321c96ce-9712-11e8-ae87-51c8143ea475′]
पुरंदरमधील दौंडज खिंडीत दत्ताञय तुकाराम शिंदे (वय ३४) असे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून येत्या ५ आॅगस्टला जलसमाधी घेत आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहे.