खुशखबर ! मारुती सुझुकीनं स्विफ्ट कारसह 10 निवडक मॉडेल्सच्या किंमती केल्या कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रसिद्ध ऑटो कंपनी मारुती सुझुकीने सणाच्या दिवसात आपली विक्री वाढवण्यासाठी काही गाड्यांच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबची माहिती दिली आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, आज 25 सप्टेंबरपासून संपूर्ण देशभरात हे नवे दर लागू होणार आहेत.
Celerio
या मॉडेल्सच्या किमतीत कपात –
मारुती सुझुकीने ऑल्टो 800, ऑल्टो K10, डिझेल कार स्विफ्ट, Celerio, Ignis, विटारा, एस-क्रॉस, बलेनो, टूर एस डिझेल (Tour S diesel) आणि डिझेल कार डिजायर या मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली आहे.
S Cross
कंपनीने या मॉडेल्सची किंमत 5000 रुपयांपर्यंत कमी केली आहे. या सर्व गाड्यांची किंमत साधारण 2 लाख 93 हजारांपासून 11 लाख 49 हजारांपर्यंत आहे.
Baleno

कॉर्पोरेट कर कपातीचा मिळेल फायदा
सणांच्या हंगामापूर्वी कारच्या किंमतीत कपात केल्याने एन्ट्री लेव्हल कारची मागणी वाढेल अशी कंपनीला आशा आहे. कॉर्पोरेट कर कमी झाल्याने अशी अपेक्षा आहे की वाहन क्षेत्राची मागणी जसजशी वाढेल तसतसे मंदीमधून बाहेर पडण्यास मदत होईल.

Visit : policenama.com