Maruti Suzuki च्या ‘या’ कारच्या प्रेमात पडला संपूर्ण देश, जोरदार होत आहे खरेदी – पहा तिची वैशिष्ट्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Maruti Suzuki | स्थानिक बाजारात सध्या वाहन उत्पादक कंपन्यांचा दबदबा आहे. परंतु सर्वात जास्त भारतीय बाजारात पकड मारूती सुझुकी (Maruti Suzuki) ची आहे. जून आणि जुलै महिन्यात मारूती सुझुकी देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार (best selling car) होती. मात्र, मे महिन्यात हुंदाईच्या कारने मारुतीकडून बेस्ट सेलिंग कार किताब हिसकावून आपल्या नावावर केला होता.

हुंदाईच्या क्रेटा (Hyundai Creta) ने मारुतीची अल्टो, स्विफ्ट डिझायर, स्विफ्ट आणि वॅगन आर
(Alto, Swift Dzire, Swift and Wagon R) सारख्या बेस्ट सेलिंग कारला मागे टाकत बेस्ट सेलिंग कारचा किताब मिळवला होता.
मात्र, यानंतर मारुती मागील दोन महिन्यापासून लागोपाठ देशात बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.
यासोबतच मारुतीची वॅगन आर मागील दोन महिन्यापासून लागोपाठ देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.

 

मारुती वॅगन आर स्पेसिफिकेशन

स्थानिक बाजारात मारुती सुझुकी वॅगन आर दोन इंजिन व्हेरिएंटमध्ये येते, यामध्ये 1.0 लीटर के-सीरीज आणि 1.2 लीटर के12बी इंजिनचा समावेश आहे.
इंजिनबाबत बोलायचे तर 998 सीसीसह K10B 3 सिलिंडर 5500 आरपीएमवर 67.05bhp ची पावर मिळते जी 3500 आरपीएमवर 90Nm चा टॉर्क जनरेट करते.
तर, 1197 सीसी बाबत बोलायचे तर यामध्ये, K12M च्यासह 4 सिलिंडर 6000 आरपीएमवर 81.8bhp ची पावर मिळते जी 4200 आरपीएमवर 113Nm चा टॉर्क जनरेट करते.

मायलेज बाबत बोलायचे तर, पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 21.79 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 32.52 किलोमीटरचा मायलेज मिळतो.
यामध्ये 32 लीटर क्षमतेचा फ्यूल टँक मिळतो. भारतीय बाजारात मारुती Wagon R एकुण 8 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

 

Web Title : maruti suzuki wagonr best selling car in india know its price specifications and mileage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | अखेर ‘स्वच्छ’ संस्थाच पुणे महापालिकेच्या मदतीला धावून आली; पालिकेच्या विनंतीवरून नव्याने समाविष्ट गावातील कचर्‍याचे विलगीकरण केले सुरू

Satara BJP | लाच घेणे पडले महागात, भाजपच्या वाई नगराध्यक्षांवर राज्य सरकारची मोठी कारवाई

BSNL | बीएसएनएलचा धमाका प्लॅन ! 120 दिवसांसाठी 240 GB Data सहित आणखी काही मिळणार सुविधा