Meteorological Center On Rainfall | खुशखबर! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, ‘अपेक’ हवामान केंद्राचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Meteorological Center On Rainfall | यंदाच्या पावसाबाबत एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ही बातमी समस्त भारतीयांसह बळीराजाला सुखावणारी आहे. कारण आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या Asia-Pacific Economic Cooperation (APEC) हवामान केंद्राने यंदा जुलै ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

अपेकने वर्तवलेल्या पहिल्या अंदानुसार, या वर्षी मॉन्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील एल-निनोची स्थिती निवळणार आहे.
तसेच ला-निनोची स्थिती तयार होऊ शकते. परिणामी यंदा पाऊस चांगला पडणार आहे.(Meteorological Center On Rainfall)

तसेच अपेकने म्हटले आहे की, भारतासह इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, कॅरिबियन समुद्र,
उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्टड्ढेलिया, दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्येही अधिक पाऊस असेल.

अपेक संस्थेने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर कालावधीसाठी ला-निना स्थिती तयार होईल.
परिणामी हवामानविषयी काम करणाऱ्या संशोधकांना त्याचे निरीक्षण करणे शक्य होईल.

तसेच या अंदाजात अपेकने म्हटले आहे की, मार्च ते मे २०२४ दरम्यान भारतात अल निनोचा प्रभाव असेल,
तर जून ते सप्टेंबर या दरम्यान ला निनाच्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर चांगला परिणाम होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Sanjay Raut | संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात?, सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला, माझ्याविरोधात…, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Dilip Walse Patil | मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले, हात फ्रॅक्चर, पाय आणि पाठीलाही दुखापत

Pune Crime Branch | होळीच्या दिवशी एफसी रोडवरील नागरिकांवर फुगे मारणारे 2 हुल्लबाज गजाआड; 2 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल (Videos)