Prakash Ambedkar On Sanjay Raut | संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात?, सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला, माझ्याविरोधात…, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबई : Prakash Ambedkar On Sanjay Raut | मविआ नेत्यांनाच (Mahavikas Aghadi) आम्हाला सोबत घेण्यास विरोध असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) यावेळी अनेकदा केला आहे. मात्र, आता स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट करून मविआच्या नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak Mumbai) निवासस्थानी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात? मुंबईतील फोर सीजन्स हॉटेल येथे ६ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर इतर कोणत्याही बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधीला आमंत्रित का केले नाही? आताही तुम्ही वंचितला आमंत्रित न करता का बैठका घेता? तुम्ही तर सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला.

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही आमच्याविरोधात अकोला येथे उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवला? हे कसले नाते बनवू पाहात आहात आपण? एका बाजूला आघाडीचे आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे आम्हाला पाडण्यासाठी कट रचायचा. असे विचार आहेत तुमचे?

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपांना संजय राऊत कोणते उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे

Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शरद पवार गटाची अजित पवारांवर खोचक टीका, ”…तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही, धाकदपट’शहां’ची…” (Video)

Rohit Pawar On Sunil Tatkare | रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, अजित पवारांची साथ सोडणारे ते पहिले व्यक्ती असतील

Bacchu Kadu On Navneet Rana | ”नवनीत राणांचा पराभव करणार”, उमेदवारी दिल्याने बच्चू कडू भाजपावर संतापले