Phillips, Mi सह इतर Smart Tv मिळतोय अत्यंत स्वस्तात अन् तेही HD क्वालिटीसह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या Flipkart वर Grand Appliance Sale सुरु आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह Smart Tv ही स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. या सेलमध्ये Nokia Tv, Realme Tv आणि Mi 4A Pro यांसारख्या ब्रँडेड स्मार्ट टीव्ही अत्यंत कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो.

Flipkart च्या Grand Appliance Sale ची सुरुवात 11 फेब्रुवारीपासून झाली आहे तर 15 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असेल. तर जाणून घेऊया कोणता Tv आहे स्वस्तात…

Mi 4A Pro :  Mi च्या 32 इंच टीव्ही खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. HD Ready LED Smart Android TV च्या सेलमध्ये या टीव्हीची किंमत 14,999 आहे. याशिवाय ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी Axis Bank Credit Card च्या माध्यमातून 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हाला हा टीव्ही हफ्त्यावर घ्यायचा असेल तर 2,500 रुपयांच्या EMI वरही घेता येऊ शकतो.

Nokia Smart TV :  Nokia चा स्मार्ट टीव्ही 32 इंच असणार आहे. HD Ready LED Smart Android TV ला 14,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकेल. जर तुम्ही Axis Bank Credit Card च्या माध्यमातून खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. तसेच EMI वर खरेदी केल्यास हा स्मार्ट टीव्ही 2417 रुपयांच्या EMI वर मिळू शकतो.

Phillips TV :  या सेलच्या माध्यमातून Phillips चा 32 इंचचा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येऊ शकतो. या सेलमध्ये HD Ready LED Smart TV हा टीव्ही 14,999 रुपयांत उपलब्ध आहे.

Realme TV :  Realme चा हा स्मार्ट टीव्ही 32 इंचचा स्मार्ट टीव्ही आहे. हा टीव्ही अत्यंत स्वस्तात दिला जात आहे. 13,999 रुपयांत हा टीव्ही उपलब्ध करून देण्यात आला आहे. Axis Bank Credit Card च्या माध्यमातून खरेदी केल्यास या टीव्हीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.