Milind Soman | मिलिंद सोमन यांचे लग्न नेहमीच चर्चेत; 26 वर्षांनी लहान बायको प्रेमाने बोलते ‘पापाजी’

पोलीसनामा ऑनलाइन – Milind Soman | सिनेविश्वात अनेक अशी जोडपी आहेत ज्यांच्यामध्ये वयाचे अंतर फार आहे. अनेकांनी अशा कपलला ट्रोल केले आहे आणि बोल सुनावले आहेत. मात्र हे कपल आजही ते त्यांचे रिलेशन एन्जॉय करत आहेत. यामध्ये शाहीद कपूर व मीरा राजपूत (Shahid Kapoor And Mira Rajput) आहे, कतरिना व विकी कौशल (Katrina and Vicky Kaushal) आहे व चर्चेत असलेले आदित्य व अनन्या (Aditya And Ananya) देखील आहेत. या सगळ्या कपल्समध्ये वयाचे अंतर जास्त असल्याने त्यांना सुनावले जाते. मात्र मनोरंजन विश्वात असेही एक कपल आहे ज्यांमध्ये अगदी 26 वर्षांचे अंतर आहे आणि ते कपल म्हणजे अभिनेते व मॉडेल मिलिंद सोमन (Milind Soman) व अंकिता कोंवर (Ankita Kunwar).

बॉलीवुडमध्ये त्यांच्या फिटनेटसाठी विशेष ओळख असलेले अभिनेते व मॉडेल मिलिंद सोमन (Milind Soman) हे नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीझोतात असतात. त्यांच्या अफेअरमुळे देखील ते चर्चीले जात होते. मात्र त्याहीपेक्षा सर्वांत जास्त चर्चेत राहिले ते वयाने 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवर (Ankita Konwar) हिच्या सोबतचे लग्न. सर्वांना या दोघांच्या लग्नाने आश्चर्याचा धक्काच बसला होता. या लग्नामुळे (Milind Soman And Ankita Konwar ) त्यांना खूप ट्रोल देखील करण्यात आले. पण मिलिंद सोनम यांचा हा दुसरा विवाह होता. या पूर्वी त्यांनी फ्रेंच अभिनेत्री मायलेन जम्पानोई (Mylene Zampanoi) हिच्या सोबत संसार थाटला होता. ती देखील मिलिंदपेक्षा 15 वर्षांनी लहान होती. मात्र त्यांचे हे नाते जास्त काळ टिकले नाही व 2 वर्षांतच घटस्फोट झाला. त्यानंतर मिलिंद सोमन यांचे नाव अनेक हिरोईन सोबत जोडले गेले.

मॉडेल असलेले मिलिंद सोमन यांच्या अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर (Milind Soman Affair) असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचे व सुपरमॉडल मधु सप्रे (Supermodel Madhu Sapre) यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अभिनेत्री शहाना गोस्वामी (Shahana Goswami), दीपानिता शर्मा (Deepanita Sharma) व गुल पनाग (Gul Panag) अशा अनेकांसोबत मिलिंग सोनम यांचे नाव जोडण्यात आले होते. मात्र त्यांनी केबिन क्रु म्हणून काम करत असेलल्या अंकिता कोंवर हिच्यासोबत लग्न केले व सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नावेळी (Milind Soman And Ankita Age Gap) मिलिंद यांचे वय 52 तर अंकिताचे वय 26 होते. अनेकांनी यावरुन या कपलवर टीकेची झोड उठवली मात्र ते त्यांचे नाते एन्जॉय करताना दिसत आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ पोस्ट करत असतात. एका मुलाखती दरम्यान मिलिंद सोनम (Milind Soman Wife) यांनी सांगितले की, अंकिता अनेकदा त्याला प्रेमाने ‘पापाजी’ म्हणते. जेव्हा त्याने अंकिताशी लग्न (Milind Soman Marriage) करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याच्या आईला धक्काच बसला. हे ऐकून अंकिताच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला होता.

Web Title :  Milind Soman | milind soman married 25 years younger ankita kunwar she calls him papaji

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा