Raigad Rain | अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Rain | हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार,
मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) राज्यभर पाच दिवस (Maharashtra Rain) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात (Raigad Rain) ही आज रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे आज (बुधवार) शाळांना सुट्टी (School Holidays) जाहीर करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (Collector Dr. Yogesh Mhase) यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील (Raigad Rain) चारही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड भोईघाट येथील सावित्री नदी मही कावती मंदिर येथील सावित्रीचे पात्र भरले असून या घाटाला पाणी लागले आहे.
तर रोहामधील नागोठणे येथील बंधाऱ्यावरील अंबा नदी सध्या इशारा पातळीवर वाहते रोहे मधील शहरातून वाहणारी डोहवाल बंधारा
येथील कुंडलिका नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा प्रशासनाने (Raigad District Administration) आज जिल्ह्यातील
सर्व शाळांना (School) आणि महाविद्यालयांना (College) सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे.

रायगड प्रशासन एनडीआरएफ अलर्ट मोडवर

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील पाताळगंगा ही नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने या चारही नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
तर रायगड प्रशासन एनडीआरएफ (NDRF) अलर्ट मोडवर सध्या आल्याचे चित्र पाहायला मिळते.

Web Title :   Raigad Rain | raigad rain holiday declared for schools in raigad district decision due to heavy rain conditions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा